वस्तूनाही असं मन
वस्तूंना मन असतं का काय माहित? पण झाडांना म्हणूनच तर ही गोष्ट मात्र खरी आहे. अनिलजी वही आहेत ना लहानपणी काही निबंध असेल ते मी पुस्तक बोलतोय मी मी शाळा बोलते आहे निबंध लिहिताना खूप गंमत वाटायची पुढे पुढे शिक्षणामध्ये त्याचा फारसा उपयोग नाही झाला आणि काळाच्या ओघात मधे असा काही विचार मनात आला नाही. परवा सहज एका मैत्रिणीचा फोन आला आणि त्यावरून तिची माझी ओळख झाली तेव्हा ची गोष्ट आठवली. मी एका कंपनीमध्ये नवीनच जॉईन केलं होतं. त्यावेळेस दिवाळी होती त्यामुळे बरंच ऑफिस रिकामं होतं ती सेल्स मध्ये एकटीच बसली होती. मी तिच्या बाजूचा कंप्यूटर चालू केला आणि माझं काम करू लागले. एकीकडे स्क्रीन कडे बघत आमच्या थोड्याफार जुजबी गप्पा चालू होत्या. आणि अचानक ति तू कशाला बाहेर तुझं काय काम आहे आता असं काहीतरी वाक्य बोलली. मला थोडंसं वेगळं वाटलं मी खरंच माझ्या जागेवरून उठून तिच्या बाजूला येउन बसले होते त्यामुळे ते मला तसं काही बोलते असं मला वाटलं. मी माझं घेतलेलं का वाटलं आणि फार काही न बोलता माझ्या जागेवर जाऊन बसले. पुढे नंतर आमची मैत्री वाढली तेव्हा माझ्या लक्षात आलं ती पेन्सिल खोडरबर कॅल्क्युलेटर सगळ्यांशी बोलत असते. तिच्या शेजारी बसणार्या मैत्रिणींनी मला बऱ्याचदा तसं सांगितलं होतं. अगदी मन लावून काम करत असते तेव्हा तिच्याकडे पाहत राहावं मध्येच फोन येतो फोन ठेवला की अरे तुझ्याकडे पाहीलच नाही का मी? तुला आधी करते असं म्हणून ती एंट्री बुक ला सुद्धा कुरवाळत हातात घ्यायची. आम्हाला सर्वांना खरच खूप गंमत वाटायची. काम करता करता कॅलक्युलेटर पडला तर सगळ्यांच्याच मनात पटकन येत, काय झालं नाहीये ना? पण त्याला कुरवाळत तुला लागलं का म्हणणारी तीच होती. आज पटकन मनात विचार आला वस्तूंना मन असतं तर. बसून आयुष्य असतं तर मनही असेल. नवीन आणलेल्या वस्तूंना अगदीं विशेष महत्त्व आणि त्या जुन्या होत गेलेल्या तिच्या देऊन टाकायच्या घरातली अडगळ कमी करायची असं म्हणत आपण त्या काढूनही टाकतो. कित्येकदा त्या कोणीतरी विशेष व्यक्ती कडून मिळालेल्या विशेष प्रसंगी मिळालेल्या किंवा आपणही खूप पैसे खर्च करून प्रायोरिटी देत घेतलेले असतात. त्यावेळेस त्यांचा राजेशाही थाटमाट आणि नंतर काळाच्या ओघात मध्ये त्यांचा पडलेला विसर आणि मग त्यांचे वर्गीकरण केलं जातं. हे सगळे अगदी सहज घडतं. पूर्वी देवाचे फोटो असलेल्या पत्रिका पेपर मासिक कॅलेंडर वेगळे ठेवले जात होते. आणि मग ते पाणवठ्याच्या जागी विसर्जन करायचे. आता मासिक, पेपर वेगळे ठेवणे शक्य होत नाही . पण तो फोटो ज्या दिवशी छापून आला असेल त्या दिवशी त्या देवाच्या फोटोचा महत्त्वही विशेष असेल. अन्न फेकता नही आता फारसा विचार केला जात नाही तिथे वस्तूंचं काय. केवळ निर्जीव म्हणून त्यांना जीव लावला जात नाही असं नाही. अनेक निर्जीव गोष्टींना आपण जीव लावतो, जपतो आणि त्या तुटलेल्या किंवा नवीन मिळाल्या म्हणून जुन्यांची अडगळ होत जाते. ती वस्तू जर चांगली असेल आणि आपल्याला नको असेल तर कोणाच्या उपयोगाला येईल एवढं तरी प्रत्येकाने करावं असं मला वाटतं. बाकी या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ आणि जागा दोन्ही कमी कमी होत आहे.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.