भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे लिम्बाच्या की मधाच्या की दोन्हींच्या हृदयविकारांवर होणार्या फायद्याची व्हाट्साप वरची एक पोस्ट तर चक्क डॉ प्रकाश आमटेंच्या नावाने फिरत होती ती त्यांनी डिसओन ही केली होती....

रॉबिन, ती लिंबू थंड करुन वापरायची पोस्ट होती. मलापण ही पोस्ट एकाने टाकली होती, त्याला असला सुनावला ना की तो पुन्हा असल्या पोस्ट टाकण्यापूर्वी सारासार विचार करेल.

अश्या फॉरवर्ड्सची कंम्प्लेंट करायलाच हवी. >> +१

पण व्हॉट्सप च्या जमान्यात ह्या ग्रुप मधे मी पहिला टाकणार याची चढाओढ असताना हा विचार कुणी करत असेल अस वाटत नाही Sad

छान धागा, नंतर लिहितो, पण खरे खोटे करून अश्यांचे संकलन केले पाहिजे. काही मिथके तर ईतकी प्रसिद्ध होतात की मग कालांतराने ती खोटी असू शकतात असा विचारही डोकावत नाही. ना कोणी तिचे मूळ शोधायला जात.

त्या सगळ्या फॉर्वर्डस पेक्षा आरोग्याशी संबंधित फॉरवर्डस जास्त घातक आहेत असे मला वाटते. म्हणून हा धागा आरोग्य मधे काढलाय. इथे अश्या फॉर्वर्डसचा संग्रह केला तर संदर्भासाठी बरे पडेल.

धाग्याच्या उद्दीष्टाशी सहमत.
>>>>पण कारवर अंडे फेकून केलेल्या वाटमारीबद्दल कोणत्यातरी पोलिस अ‍ॅकॅडमीच्या कुणा इन्स्पेक्टरच्या >>>><<<< मात्र... याच्याशी असहमत. इब्लिसबुवा, वाटमारीकरता नको, अगदी कारवरतीही नको, घरातल्या आरशावर अंड्यातील द्राव शिंपडून मग पाणी शिंपडून पुसुन काढायचा प्रयत्न करुन बघा.... करुन बघा काय होते ते. अंडे फेकुन खराब केलेली काच पाणी उडवून व्हायपरने साफ करायचा प्रयत्न केल्यास काय होते ते स्वतःच्या गाडीवर अंडे टाकून मग वायपर चालू करुन अनुभवलेत तरी चालेल. आलेला अनुभव उद्या इथे कळवा.

अरे बापरे ती लिम्बाची बाब खोटी होती....मैत्रीणीने प्रयोग करुनही पाहिला होता...

<<<<त्या सगळ्या फॉर्वर्डस पेक्षा आरोग्याशी संबंधित फॉरवर्डस जास्त घातक आहेत असे मला वाटते. म्हणून हा धागा आरोग्य मधे काढलाय. इथे अश्या फॉर्वर्डसचा संग्रह केला तर संदर्भासाठी बरे पडेल.>>>>
याला १०० टक्के अनुमोदन

लिम्बाची बाब खोटी कशी काय? (मी तर कध्धी कध्धीच खोटे बोलत नाही)
अहो लिम्बाचे सालीसकटचे लोणचे चाखतमाखत खातोच ना आपण? (बहुसंख्य तरी खातात)
तर कच्च्या लिम्बाची साल मात्र न वापरता फेकुन दिली जाते, वापरलीच फार फार तर कुकर आतून स्वःच्छ करायला वापरली जाते.
तेच जर लिम्बू डीफ्रिजमधे गोठवून मग किसून वापरले सालीसकट तर छान लागते, मी खाल्लय एकजणांकडे, पहिल्यांदा तर कळलेच नव्हते की कशाचे काय आहे. सालीसकट लोणचे चालते तर कच्च्या सालिचा वापर करायचा उपाय सांगितला तर त्यात प्रॉब्लेम काये?
हं, लावला असेल थोडा मीठ मसाला मजकुरात की त्याचे अन्य "आयुर्वेदिक" फायदे कायेत..... आता असेना वा नसेना फायदे, लिम्बाची साल तर वाया जाता नाहीना त्या उपायामुळे? अहो केळ्याची सालही वाया जाऊ न देता खाणार्‍या "पेठी कोब्रांच्या" रंगवुन रंगवून सांगितलेल्या गोष्टी ऐकता/सांगता, त्यापुढे लिंबाच्या सालीची ती काय तमा? नै का?

[नीरजे, सॉरी, पण अगदीच रहावले नाही ग]

आधी जे फेसबुकवर फिरायचं ते आता व्हॉट्सॅपवर फिरतं.

रस्त्यावर हातगाडीवर विकले जाणारे अननस/कलिंगड खाल्ल्याने पंधरा दिवसांत एड्स (होय एड्स) झालेला दहा वर्षांचा मुलगा.

आता हे मराठीत सुरू झालंय :
मेथी, जिरे आणखी एक काहीतरी विशिष्ट प्रमाणात घेऊन लोखंडी कढईत भाजून त्याची पावडर करून रोज खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेहापासून ते वंध्यत्व व बहिरेपणा कशावरही मात करा.

खोबरेल तेलाचे फायदे डॉ. मीना नेरूरकरांच्या नावे.

अमक्या हॉस्पिटलात कॅन्सरवरचे विशिष्ट औषध फुक्कट.

कारवरच्या अंड्याबद्दल

While a mixture of raw egg and water vigorously stirred together in a glass will produce a somewhat milky-looking liquid (which might be the source of this tale), there's nothing about the interaction of egg and water that renders the resulting combination into a substance guaranteed to completely block a driver's vision. Egg alone or egg-and-water solutions are thin liquids and so are relatively easy to see through, with the vehicle's wipers generally sweeping away the worst of the mess fairly easily. Moreover, it would take a number of extremely well-placed eggs (a hen's typical offerings aren't that big) to splat a windshield so thoroughly as to completely impair the driver's view and force him to stop immediately — unless the visibility conditions were already poor, a motorist with a splattered windshield would generally still be able to see well enough to continue driving out of range of the egg-throwing hooligans to a safe stopping place.

Certainly miscreants have long engaged in the practice of launching objects (rocks, eggs, firecrackers, paintballs) at moving cars in order to startle motorists into stopping and getting out of their automobiles (typically as a prank, but sometimes as a means of setting up the theft of a vehicle and/or the driver's possessions), but that information is neither new nor shocking.
Read more at http://www.snopes.com/crime/warnings/eggthrow.asp#ikxMKXWmYfMrESeu.99

मागे एक वाचला होता :

एका लहान मुलाला एड्स झाला . संक्रंमण कुठुन झाले ते कळेना .
मग शोधाशोध केल्यावर कारण सापडले .
काही दिवसापूर्वी त्याच्या आईने त्याच्यासाठी अननस आणलं होतं
त्या फळ विक्रेत्याला एडस होता . अननस कापताना सूरी त्याच्या बोटाला लागली.
रक्त लागलं अननसाच्या फोडीना .
हे जंतू हवेच्या संपर्कात आल्यावर .......... ई.ई ई.ई....

कैच्याकै

हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट मागे फेसबुकवर आलेली वाचुन पाचव्या मिनटाला विसरुन पण गेले.
राजिव दिक्षित च्या आर्टिकल्सच्या पण खुप पोस्ट यायच्या पुर्वि .अश्या पोस्टींकडे दुर्लक्षच केल जात भोवतेक.

मी एकाला असाच झापला होता,
सांगितले होते की खूप पूर्वी म्हणजे तीसेक वर्शांपूर्वी संतोषीमातेच्या नावाने अमुक इतक्यान्ना पत्र पाठवा अशी पोस्टकार्डे यायची त्याच धर्तीवर हल्ली हे अमुक इतक्यान्ना हा मेसेज वॉट्स अप वरुन पाठवा म्हणजे अमुक होईल/ब्यालन्स-टॉकटाईम वाढेल अशा काहीशा अर्थाचा मेसेज होता. अन हो, whatsapp नॉनपेड रहायला हव असेल तरिही म्हणे अमुक इतक्यान्ना मेसेज पाठवा....

भरत, त्यात अजुन एक मुद्दा आहे, की गाडी जर ७० ते १२० च्या वेगात असेल, अन त्यावेळेस पाणी मारुन वायपर सुरु केल्यावर वायपरच्या पहिल्या रिव्हर्स स्ट्रोकला जी थीन फिल्म बनेल ती वार्‍याच्या झोताने तत्काळ वाळून सफेद/धुरकट होऊन ड्रायव्हरची वाट लावेल व रात्रीच्या अंधारात याचा परिणाम जबरदस्त असेल.

ह्यात लहान मुलं हरविल्याच्याही असंख्य पोस्टी येताहेत आता..

मध्यंतरी टाटा मेमोरियल च्या नावाने ब्रेस्ट कैन्सर संदर्भात एक पोस्ट आली होती. कैच्या कै कारण दिली होती ब्रेस्ट कैंसर होण्याची/टाळण्याची! बाहेर जाताना ओढणी किंवा पदर घेतल्याने ब्रे के होत नाही म्हणे! आणि हे फॉरवर्ड करणारी व्यक्ति (होमियोपैथी) डॉक्टर होती... टाटा मेमोरियल च्या वेबसाइट वरुन योग्य ती माहिती शोधुन त्या व्यक्तीला लिंक पाठवून दिली! चिडचिड होते असे messages बिनडोक पणे फॉरवर्ड करणाऱ्या लोकांवर...
मी बऱ्याच ग्रुप्स मधून बाहेर पडून बरीच मन:शांती मिळवली आहे मागील काही महिन्यांत! Happy

तो फ्रोजन लिंब वापरण्याचा प्रयोग साबांनी केला होता. मला तर तो प्रकार फार फार आवडला. पोह्यांवर वगैर असा किसलेला लिंबू अप्रतिम लागतो!

इथे फक्त आरोग्य संदर्भातले भोंदू फॉर्वर्डस लिस्ट करा मंडळी.
अमुक फॉर्वर्ड करा तुमचे भाग्य फळफळेल हे भोंदू आहे हे पोस्टकार्डाच्या जमान्यापासून सगळ्यांना माहितीये. आणि ते तसे फॉर्वर्ड केल्याने तुम्हाला चार शिव्या बसण्यापलिकडे अपाय होत नाही.
आरोग्याच्या संदर्भातले भोंदू फॉर्वर्डस कुणी खरे मानून उपाय करू लागला तर जीवाशी गाठ असते म्हणून ते जास्त घातक आहेत.

पोह्यांवर वगैर असा किसलेला लिंबू अप्रतिम लागतो! <<
अप्रतिम लागतो ना. डेंग्यू, कॅन्सर, एडस वगैरे पासून वाचवतो का? नाही ना? Happy

फ्रोझन लिंबाचा प्रयोग करण्यात काहीच वाईट नव्हते म्हणुन मीही तो करुन पाहिला. प्रयोग केल्यावर लक्षात आले की त्यात लाईम वापरा लिहिलेले. आपल्याकडे लाईम आणि लेमन दोघांसाठीही लिंबू हाच शब्द वापरला गेला तरी दोघात खुप फरक आहे. आपल्याकडे जी लिंबे मिळतात त्यांची साल खुप कडु असते. लिंबाचे लोणचेही आपण मुरल्यावरच वापरतो. ताजे लोणचे कडू लागते. मी कुठल्या पदार्थावर प्रयोग केला ते आता आठवत नाही पण प्रयोग केलेला पदर्थ कडू झाला आणि तो मलाच गुपचूप गिळावा लागला. मी हे माझ्या फेबूवरही अपडेट केले होते की मूम्बईबाहेर हा प्रयोग चालु शकेल पण मुंबईत मिळणा-या लिंबांवर हा प्रयोग करु नका. Happy

लिंबू कायम वापरल्याने तब्येत चांगली राहील. कॅन्सर डँग्यु कदाचित तुमच्याकडे फिरकणार नाहीत. पण जर हे तुम्हाला भेटायला आले तर मात्र लिंबू खाऊन काहीही भले होणार नाही.

आयुर्वेद किंवा आपले पारंपारिक उपचार, यांची माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे हे सगळे प्रिवेंटीव असतात. दीर्घकाळ करत राहिल्यास प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि त्यामुळे रोग कदाचित होणार नाहीत. पण जर काही झालेच तर मग हे प्रिवेंटीव औषध काहीच कामाचे नाही. तिथे अलोपथिक डॉक्टरच पाहिजे.

पिंपळपानाचा रस स्किन इन्फेक्षनवरही वापरतात. मीही सध्या घेत आहे, पण फॉरवर्ड वाचुन नाही तर आयुर्वेदिक डॉ. च्या सल्ल्याने. पण जर हार्ट अ‍ॅटॅक आला तर मात्र केवळ पिंपळपानाचा रस घेणे म्हणजे स्वतःहुन मृत्युला निमंत्रण देणे.

आमच्याच व्यवसाय बंधुनी ( जो अर्थातच वैद्यकिय नाही ) आमच्या संस्थेचा वापर करत असेच एक इमेल पाठवले होते. मी ते डॉ. इब्लिस यांना पाठवले तर त्यांनीही याबाबतीत काही करता येणे अशक्य आहे असे सांगितले होते.
अश्या चुकीच्या फॉरवर्डसवर योग्य माहिती असलेले रिप्लाय करणे हा एक उपाय आहे.

व्हॉट्स अप चे अद्यावत तंत्र वापरूनही लोक अशी अंधश्रद्धाच पसरवत राहणार असतील तर ....

आजवर मला आलेल्या अश्या आरोग्यविषयक फसव्या फॉर्वर्ड्समध्ये 'अपायकारक उपाय' एकही नव्हता. हे मेसेजेस फसवे, दिशाभूल करणारे असतात हे मान्य आहे. ते निराधार असतात / असू शकतात, हेही मान्य आहे. काही अजाण वाचकांनी कोणतीही शहानिशा न करता त्यात दिलेले प्रयोग करून बघणे शक्य आहे, हेही मान्य आहे. पण निदान माझ्या अनुभवात त्यातील उपाय हे थेट अपायकारक नव्हते. ते उपाय केल्यामुळे पैसे, वेळ खर्च होणे, उगाच भाबडी आशा वाटत राहणे हे शक्य आहे ह कबूल. हे उपाय करत आहोत म्हणून डॉक्टरकडे जात नाही आहोत असे म्हणणारी माणसे असली तर आपला त्यांना नमस्कार! पण ते उपाय करून कोणी आजारी पडेल असे उपाय निदान माझ्या फोनवर तरी अद्याप आलेले पाहिलेले नाहीत.

हे उपाय करत आहोत म्हणून डॉक्टरकडे जात नाही आहोत असे म्हणणारी माणसे असली तर आपला त्यांना नमस्कार! <<
असे लोक माहित आहेत दुर्दैवाने. कोपरापासोनि दंडवत कधीच घातलाय त्यांना.
अपायकारक नसले तरी घातक एक्झॅक्टली याच कारणासाठी आहेत.

इब्लिस,

तुम्ही सर्जन आहात का पोस्ट मॉर्टेमसाठी नियुक्त केलेले कटर, हेच मला समजत नाही.

माझा ह्या धाग्यावरील पहिला प्रतिसाद अतिशय सुयोग्य भाषेत आहे आणि त्यावर नीधपंनी 'तशी माणसे त्यांना ज्ञात असल्याचे' सांगितलेलेही आहे.

>>>त्यावर विश्वासून वाचणार्‍याने ते उपचार केले, तर काय काय होऊ शकते, ते मला ठाऊक आहे. <<<

हे खूप आवडले.

खरोखरच दोन तीन उदाहरणे कृपया द्यावीत. निदान मला येणार्‍या मेसेजेसना मी तुमची ती उदाहरणे तुमच्या (मायबोलीवरील) नांवासकट (व प्रत्यक्षातील हुद्यासकट) रिप्लाय म्हणून देत जाईन.

दॅट वुड बी अ व्हॅल्यू अ‍ॅडिशन इब्लिस!

Pages