शब्द ..

Submitted by योगेश_जोशी on 7 May, 2018 - 23:54

.

.

शब्द
~~~~

.
शब्द उमटला
अर्थ मिळवला
शब्द वाढला
कलह आरंभला

शब्द झिरपला
सांत्वन जाहला
शब्द गोंजारला
मद उफाळला

शब्द झेलला
आज्ञा लाधला
शब्द पडला
आब ओशाळला

शब्द अक्षय्य ठेवला
शब्द निश्चय मांडला
शब्द उलगड़ता मनाला
पुनश्च निःशब्द मात्र झाला ....!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

छान ! Happy

माझे दोनचार..

"शब्द जपला
विश्वास वाढला
शब्द पसरला
घाव जाहला"

शब्द जपला
विश्वास वाढला
शब्द पसरला
घाव जाहला" >>> मस्तच

~~~~ अजुन थोडी भर ―

शब्द फितुरला
गनिम परवडला
शब्द असंगतीने
ध चा मा जाहला