हितगुज ग्रूप

घे भरारी..मन म्हणाले...

Submitted by सत्यजित... on 11 March, 2017 - 20:31

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

चौकोन

Submitted by सेन्साय on 3 March, 2017 - 07:17

चार कोनांनी बनतो तो चौकोन पण ते काटकोनात असणे दर्शवते निटनेटकेपणा - परफेक्शन ! साधी सरळ पण आवश्यक रचना जसे मनुष्यास आवश्यक असतात दोन हाथ आणि दोन पाय… ह्यातील एखाद्याचे अस्तित्व नाकारणे म्हणजेच व्यंग अर्थातच जीवन जगताना मूलाधार चक्राच्या चारही पाकळ्यांचे यथायोग्य पालन म्हणजे परीपूर्णता आणि ते सध्या घडत नाहीये म्हणून येतेय मानसिक आणि शारीरिक व्यंग. …. व्यक्तिगत व सामाजिक !!

फुले फुलतात देठावर!

Submitted by सत्यजित... on 28 February, 2017 - 14:53

कुठे असतात भानावर...
फुले फुलतात देठावर!

मनाची काहिली होते...
तुझा शिमगा जरा आवर!

जरासा तोल जाऊ दे...
भले नंतर मला सावर!

तुझे येणे कुठे लपवू?
जसा गजरा..तुझा वावर!

जळाले आजही काजळ...
तुझ्या लालीच ओठावर!

—सत्यजित

पद्मा आजींच्या गोष्टी १५ : श्रद्धेचे बळ

Submitted by पद्मा आजी on 26 February, 2017 - 00:30

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

सर्वांच्या अभिप्रायां बद्दल धन्यवाद. तुमच्या अभिप्रायांमुळे मला प्रोत्साहन मिळते व नवीन गोष्टी आठवतात. म्हणून प्रतिसाद देण्याची विनंती.

मी तुम्हाला आज माझ्या बहिणीच्या सासऱ्यांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

एकदा काय झाले, मी गेले होते माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरी म्हणजे - नागपूरला. धंतोली परिसरात राहायची ती.

पद्मा आजींच्या गोष्टी १४ : वेळ आली होती पण...

Submitted by पद्मा आजी on 18 February, 2017 - 18:42

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.

मी तुम्हाला आज माझ्या वडिलांची गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे.

एकदा काय झाले, माझ्या वडिलांचे मित्र आले आमच्याकडे व त्यांनी वडिलांना विचारले, "चलता का बरॊबर अकोल्याला? माझ्या मुलीला एका स्थळा विषयी दाखवायचे आहे."
वडील म्हणे, "चलतो, केव्हा जायचे?"
"उद्या सकाळी."
"ठीक आहे. येतो."

तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा...

Submitted by सत्यजित... on 18 February, 2017 - 15:58

जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!

तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!

चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!

कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!

दहशतवाद आणि त्याची मानसिकता

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 22:24

मानवाने आपल्यातील विचार करण्याच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करून स्वतःची सुरक्षितता सुदृढ करण्याचा प्रयत्न केला. परंतु असे असूनही आजचा आधुनिक मानव पूर्णपणे सुरक्षित आहे का, की तो अधिकच असुरक्षित झालेला आहे? अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानव अधिक सुरक्षित वाटत असला तरी आज माणसाच्या सुरक्षिततेला सर्वात मोठा धोका हा माणसापासूनच आहे.

बालपण

Submitted by सेन्साय on 15 February, 2017 - 05:05

बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
बालपण देगा देवा
पुन्हा तो निरागस ठेवा
काय मौजेची ती लंगडी
आणि पकडा पकडी
शिकवण त्यात भरूनी राहिली
दु:खातही सुखे पकडण्याची ओढी
खेळता मित्रांसंगे लगोरी
त्याची तरहा अजुनी न्यारी
नेम साधुनी घेतलास तू
संकटावर मात आणि उद्दिष्टे सारी
एकीचे बळ अनुभवले
खेळताना मी कबड्डी
सप्त -चक्रांचे महत्व ठसवलेस
उपयोगी पडले घडोघडी

"मी"

Submitted by सेन्साय on 13 February, 2017 - 09:50

अगणित शत्रू मिळून न केले
द्विगुणीत नुकसान मीच माझे
गरज पडता धावा केला देवाचा
ईप्सित साधता आठव फक्त स्वार्थाचा
असा मी माझीच झोळी फाडाया तत्पर झालो
विसर होताच तुझा, माझा "मी" मोठा झालो
मीच माझा ..... या अहंकारात गुरफटता
पुन्हा काठी बसली न आवाज करता
अकारण कारूण्य तुझे
ज्यामुळे मी भानावर आलो
तुझ्या चरणी माथा टेकता
सुखी अनन्य झालो

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप