"माझी लिस्ट"

Submitted by अंबज्ञ on 20 May, 2018 - 05:32

.

.

आज जास्तच गर्दी होती तिकडे , कामाच्या ताणामुळे 3-४ दिवस नीट झोप सुद्धा झाली नव्हती हे त्याच्या डोळ्याखालची वर्तुळे स्पष्ट सांगत होती.

सर्वांकडे जातीने लक्ष देताना त्याची पुरती दमछाक होत होती. मी मात्र आजुबाजूच्या लोकांच्या नकळत फक्त त्यालाच बघत होतो. निराकार अस्तित्व माझं कुणाला जाणवत नाही पण सगुण परिणामाने सर्वजण हमखास बिथरुन जातात.

आजदेखील इथं येण्याचं कारण तसेच काही ख़ास होतं. मी हळूहळू प्रत्येक व्यक्ति अंतर्बाह्य स्पर्शुन फिरत होतो.

माझ्या लिस्टपैकी तिघांवर जरा बारीक लक्ष ठेवून होतो. एक निसंतान म्हातारी जी गेले सहा महीने कोमात आहे की तो कोकेनच्या अतिसेवनाने निपचित पडलेला अब्जाधिशाचा एकुलता वारस ; कि सामूहिक अत्याचाराला बळी पडल्याने इथे उपचारांसाठी आणले गेलंय ती असहाय्य तरुणी !

माझ्या जवळच्या खलित्यावर हळूहळू एक नाव उमटत होतं ते बघून क्षणभर मलाच धस्स झालं. माझं काम आता सुरू झालं होतं. मी हळूच त्या व्यक्तिच्या जवळ गेलो आणि त्याला फक्त हळुवार स्पर्श करताक्षणीच त्याच्या छातीत कळ सुरू झाली असती.

पण मी मात्र त्याला स्पर्श न करताच बाजूला झालो. कारण त्या संदेशावर तिघांचेही जीव वाचवणाऱ्या डॉक्टरचं नाव होतं ...!

आणि मी कधीच रिकाम्या हाताने जात नसतो ...

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. यावरून सॉमरसेट मॉमच्या गोष्टीची ""The Appointment in Samarra" आठवण झाली.

Death speaks: (The speaker is Death)

There was a merchant in Bagdad who sent his servant to market to buy provisions and in a little while the servant came back, white and trembling and said, Master, just now when I was in the market-place I was jostled by a woman in the crowd and when I turned I saw it was Death that jostled me. She looked at me and made a threatening gesture; now, lend me your horse, and I will ride away from this city and avoid my fate. I will go to Samarra and there Death will not find me.

The merchant lent him his horse, and the servant mounted it, and he dug his spurs in its flanks and as fast as the horse could gallop he went. Then the merchant went down to the market-place and he saw me standing in the crowd and he came to me and said, Why did you make a threatening gesture to my servant when you saw him this morning? That was not a threatening gesture, I said, it was only a start of surprise. I was astonished to see him in Bagdad, for I had an appointment with him tonight in Samarra.

मस्त लिहिलंय.

उपाशी बोका, तुम्ही दिलेली गोष्टही छान.

क्षणभर थरारुन गेले मी, अम्बज्ञजी! फारच सुन्दर!

आणि सॉमरसेट मॉमचि गोष्ट पण अप्रतिम आहे.

मस्त!

===
सॉमरसेट मॉमची गोष्ट आत्ता परवाच bbc शेरलॉक सीझन 4 मधे ऐकलेली.