मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले.
रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्या स्मितहास्यातला रोमान्स!
सचिन रमेश तेंडुलकर. नुसत्या नावाने अंगावर अभिमानाचे रोमांच उठतात असा तो सचिन, सच्या, सच्यू,तेंडल्या,मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, रन मशिन, बॉलर्सचा कर्दनकाळ, शतकांचा बादशाह, क्रिकेट बुक, आणि असे कितीतरी नावे व विशेषने असणारा हा महामाणव आमच्या महाराष्ट्रात जन्मावा हे आमच भाग्यच.
सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.
सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे.
क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.
क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.क्रिकेट.
क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट.
क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट.क्रिकेट. क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट. क्रिकेट .क्रिकेट.
आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!
त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..
माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!
अश्रू अनावर झाले.
एक लांबलचक भाषण करून तो "थँक यू' म्हणाला आणि अश्रू अनावर झाले. मग त्याला उचलून सगळ्यांनी ग्राऊंडला फेरी मारली. रडवेले चेहरे त्याच्या नावाचा अविरत जयघोष करत होते. आत्ताच, या क्षणाला पांगापांग सुरू झाली असेल कारण याच क्षणाला सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रूममध्ये गेला आहे.
नकळत त्याच्या भाषणानंतर मनापासून टाळ्या वाजवल्या गेल्या आणि खुर्चीवरून उठून उभा राहिलो तोही नकळतच!
एका पर्वाची अखेर झाली.
सचिन रमेश तेंडुलकर. नुसत्या नावाने अंगावर अभिमानाचे रोमांच उठतात असा तो सचिन, सच्या, सच्यू,तेंडल्या,मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, रन मशिन, बॉलर्सचा कर्दनकाळ, शतकांचा बादशाह, क्रिकेट बुक, आणि असे कितीतरी नावे व विशेषने असणारा हा महामाणव आमच्या महाराष्ट्रात जन्मावा हे आमच भाग्यच.
खर तर मला अजिबात पटत नाही कुठे काही झाल की कविता खरडावी, पण आजचा दिवस खरच स्पेशल आहे, आणि मी स्वतःला आवरु शकत नाही, आजचा दिवसच मित्रां बरोबर बसुन जुन्या आठवणीनां उजाळा देण्याचा... सचिनच्या सेंडऑफ पार्टीचा... दहावीच्या सेंडऑफ नंतर हा आजचा सेंडऑफ जेंव्हा नक्की माहीत असत आता ही मज्जा पुन्हा नाही...
सचिन सॉरी यार आज खरच हळवा झालो...
सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता...
आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला
तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो
दुडूदूडू पावलांची चिंता