भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
आज पहिला सामना आणि तरी क्रिकेट बाफ वर प्रतिक्रिया नाहीत. भारताचा वाईट वॉश झाल्यामुळे असेल. पण घरके मैदानपे हम शेर है असे बरेच लोकं म्हणतात. चला तर मग ... नेहमीसारखेच आपल्या प्रतिक्रिया येऊद्यात.
नमस्कार मंडळी...
इंग्लंड दौरा ची एक दुखःद घटना म्हणुन नोंद करावी.. दोन दोन धागे उघडुन सुध्दा भारत हारतच होता...(अंधश्रध्दाच आपली:) ) सगळ्या गोष्टी करुन पाहील्यात पण विजय काही मिळतच नव्हता..शेवट पर्यंत मिळाला नाही.. १० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी ८ मधे पराभव आणि २ अर्णिनित हेच गणित शेवटी मिळाले...
असो... आत ते येतील भारतात तेव्हा बदला घेउच.... 
चॅम्पिअन लीग साठी आता सज्ज व्हायला हवे... भारतातले ४ क्लब संघ जागतीक क्लब संघांविरुध्द दोन दोन हात करणार आहेत....
इंग्लंडमधे नुकत्याच झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काही आठवणी जाग्या झाल्या. इंग्लंडात मार खायची काही ही पहिली वेळ नाही. ४२ मधे सर्वबाद व्हायचं रेकॉर्ड आपल्या नावावर इथेच जमा आहे. त्या टीममधे पण अनेक महान फलंदाज होते.
पण काही खेळाडू असे असतात ज्यांच्यामधे डावालाच नाही तर संघाला उभारी द्यायची क्षमता असते. त्यांच्या थोड्याच खेळ्या अशा येऊन जातात कि महान म्हणवल्या गेलेल्या खेळाडूंना आपल्या कामगिरीचा विचार करण्याची पाळी येते. अशा कलाटणी देणा-या खेळाडूंमधे सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते कपिलदेव निखंज याचं. निव्वळ रेकॉर्ड किंवा आकडेवारीने गेममधला थरार कसा कळणार ?
कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.
भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.