अश्रू अनावर झाले - सच्चीऽऽऽऽऽऽन सच्चीन

Submitted by बेफ़िकीर on 16 November, 2013 - 02:37

अश्रू अनावर झाले.

एक लांबलचक भाषण करून तो "थँक यू' म्हणाला आणि अश्रू अनावर झाले. मग त्याला उचलून सगळ्यांनी ग्राऊंडला फेरी मारली. रडवेले चेहरे त्याच्या नावाचा अविरत जयघोष करत होते. आत्ताच, या क्षणाला पांगापांग सुरू झाली असेल कारण याच क्षणाला सचिन तेंडुलकर ड्रेसिंग रूममध्ये गेला आहे.

नकळत त्याच्या भाषणानंतर मनापासून टाळ्या वाजवल्या गेल्या आणि खुर्चीवरून उठून उभा राहिलो तोही नकळतच!

एका पर्वाची अखेर झाली.

त्याची पत्नी आणि मुलगी, शंख फुंकणारा रसिक, हजारो प्रेक्षक, हे सगळे तर रडत होतेच, पण शेवटच्या क्षणी सचिनने पुन्हा मैदानात येऊन पीचला हात लावून नमस्कार केला आणि तो स्वतःही रडला तेव्हा मात्र......

...... घळघळून रडू आले मला.

दैवाने भारत देशातील क्रिकेट रसिकांवर, जगातील क्रिकेट रसिकांवर आणि क्रिकेटवर केलेल्या या प्रतिभाविष्काराच्या कृपेला साष्टांग दंडवत!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिनची आणि माझी भेट एकदाच सिकंदराबादला १९९० साली झाली होती. नुकताच पाकिस्तान आणि इंग्लंडचा दौरा करून आला होता. कुठल्यातरी क्लब मॅचेस होत्या. त्यात बॉम्बे कोल्ट्स नावाच्या टीमकडून खेळत होता. संजय मांजरेकर त्या टीमचा कॅप्टन होता. आर्मीच्या एका ग्राऊंडवर मॅच होती. मी तिथला अधिकारी होतो. मांजरेकर त्याच्या नेहमीच्या कॅप्टनकीच्या गर्वात (किंवा कदाचित टेन्शनमध्ये असेल) होता. तेव्हा सचिनशी मी अर्धा तास गप्पा मारल्या.

एक तर परकी मुल्कात मराठी माणूस म्हणून त्याला आत्मीयता वाटली असेल. पण आमचे बोलणे चालले होते ते संदीप पाटील बद्दल. त्या काळचे बॉम्बेचे खेळाडू गावसकर किंवा वेंगसरकरपेक्षा संदीप पाटील ला जास्त मानायचे. सचिनही त्याला अपवाद नव्हता. त्याची तळाशी जड बॅटसुद्धा संदीप मुळेच.

त्याला सगळ्यात जास्त कौतुक कशाचे होते ते सांगितले तर तुम्हाला आश्च्रर्य वाटेल. इंग्लंडच्या दौर्‍यानंतर बी.सी.सी.आय. ने सर्व खेळाडूंना क्रिकेट्ची हेल्मेट चक्क फुक्कट भेट म्हणून दिली होती. त्याचं सचिनला भलतं अप्रुप वाटत होतं. त्यानं दोन-तीन वेळा मला त्याचं हेल्मेट दाखवलं, त्याच्या काय काय फिचर्स आहेत ज्यामुळे बॉलने डोक्याला जखम होत नाही ते दाखवले आणि बी.सी.सी.आय. ने भेट दिल्याचं सांगितलं.

चार वर्षापूर्वी दीनानाथच्या पायाभरणीला आला होता तेव्हा इच्छा असूनही भेटता आले नाही; मी सिक्युरिटी-इन-चार्ज असल्याने गर्दीवर नियंत्रण हे माझे काम होते.

आज त्याचा निरोपाचा क्षण पाहिला आणि अक्षरशः भारावून गेलो.

हॅट्स ऑफ टू यू सचिन......

सचिन क्रिकेटीअर म्हणून जितका चांगला आहे त्यापेक्षाही जास्त माणूस म्हणून चांगला आहे त्याचा पुनःप्रत्यय आला. किती मनापासून, किती छान बोलला...अंजलीबद्दल तो बोलत असताना तिच्याकडे पहावत नव्हते...बिचारीला त्याला कुठे ठेवू न कुठे नको झाले होते....आणि मग फक्त रडायला येत होते.

चला भारतरत्न पण दिले..... Happy त्याचे सुरवातीचे पाकिस्तान विरुधचे सामने आठवले आज

खरचं.. गेला आठवडा नुस्ता सचिन सचिन ऐकुन कंटाळा आला होता.. पण काल मॅचचे अपडेट फक्त त्याच्यासाठीच बघितले.. आज त्याच्या भाषण संपल्यावर डोळ्यात पाणी केव्हा आलं कळलच नाही.. त्याने पिचला नमस्कार केल्यावर तर अजुनच...

सचिनला भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय, मिडीया पुढचे अजूनही अनेकानेक दिवस सचिन-सचिन नक्कीच करणारेत.

रडणे इतक्यात संपवू नका Light 1

मी तर इतका इतका इतका रडलो ना की डोळे टॉवेलने पुसून पुसून पिळून घ्यावे लागले. ह्या पिळलेल्या टॉवेलची एक लहानशी बादलीच भरली आहे. आता ती बादली मी सचिनदेवाची आठवण म्हणून शीलबंद गडूत जपून ठेवणार आहे.

बेफी साहेब!! तुम्ही कदाचित हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता!!
मी जरा वेगळे लिहितोय.
आपल्या कुटुंबाबद्दलच्या , आईबद्दलच्या, अन मुलांबद्दलच्या, सर्वांच्या,विशषतः कॉर्पोरेट जगातील माणसांच्या, व्यावसायिकांच्या, ज्या ग्राईंड मधून त्यांचे आयुष्य गेले त्यांच्या, निवृत्तीच्या वेळी भावना तत्समच असणार ना?
यात सचिनच्या भावनांचा अनादर उद्धृत नाही.
त्यामुळे त्याच्या व्यावसायिक अन वैयक्तिक जीवनाची गफल्लत झाल्याने आपण आपला समतोल ढळून बसलो आहोत का?
मी सुध्दा त्याचा पंखा आहे पण त्याच्या व्यावसायिक साठी!!

चू भू दे घे

@दैवाने भारत देशातील क्रिकेट रसिकांवर, जगातील क्रिकेट रसिकांवर आणि क्रिकेटवर केलेल्या या प्रतिभाविष्काराच्या कृपेला साष्टांग दंडवत! >>> __/\__/\__/\__

बेफिकीर,
सचिन चा मिडीया ऊदो ऊदो आवरा म्हणताना तुम्हाला शेवटी अश्रू अनावर झाले की. Happy
हलके घ्या!

रच्याकने: बरेच लोकांनी त्याच्या भाषणाचा ऊल्लेख 'लांबलचक' असा केला आहे. मला वैयक्तीक ते भाषण संपूच नये असे वाटत होते. For the first time, i preferred his words over his bat!

रच्याकने: बरेच लोकांनी त्याच्या भाषणाचा ऊल्लेख 'लांबलचक' असा केला आहे. मला वैयक्तीक ते भाषण संपूच नये असे वाटत होते. For the first time, i preferred his words over his bat!
>>>> +1000

लांबलचक....को???????????

काही खोट चुकीचे बोलत होता का ? की खोटे चुकीचे बोललेले चालते ..मनोरंजन म्हणुन काही लोकांना.. Biggrin

मनापासुन बोलत होता....... खोटे मुखवटे धारण करणार्यांना आवडणार नाही असे बोललेले योग ...

च्याकने: बरेच लोकांनी त्याच्या भाषणाचा ऊल्लेख 'लांबलचक' असा केला आहे. मला वैयक्तीक ते भाषण संपूच नये असे वाटत होते. For the first time, i preferred his words over his bat!
>>>
अगदी अगदी!
तो स्वतःही जेंव्हा म्हणाला की माझं भाषण लांबतय तेंव्हा तमाम पब्लिकने नोssss ची आरोळी ठोकलीच की Happy

सचिनचा मोठा भाऊ नितीन चक्क कवी आहे, पुरेसा अबोल, भिडस्त स्वभावाचा.''पावसाळा '' या नावाचा त्याचा एक कवितासंग्रह आहे. अशा या मराठी लिटरेचरवाल्या घरात हे वेगळाच इतिहास घडवणारं पिल्लू जन्माला आलं , गंमत आहे.

सचिनचे सो कॉलड लांबलचक भाषण खूप फेमस झालेय, मला तर त्याचा शब्दनशब्द पाठ आहेच, पण आता तो सर्वांनाच होईल कारण माझ्या पाहण्यात आतापावेतो मार्केटमध्ये त्याची दोन विडंबने आलीत.
पैकी एक राहुल गांधीचे भाषण आहे, अर्थात पप्पू पपू म्हणत खेचलीच आहे, आणि दुसरे विराट कोहलीचे आहे, अर्थात त्याच्यातही खेचलीच आहे पण त्यात कोहलीला साजेशी तूफान शिवीगाळ असल्याने ते थोडेसे मांसाहारी आहे.

सचिनचे वडील प्रा.रमेश तेंडुलकरही कवी होते. मराठी भाषेशी संबंधित एका समारंभात सचिनने त्यांची एक कविता वाचून दाखवली होती.