IPL चं पहीलं वर्ष २००८. पुण्यामधे मॅच बघायची सोय नव्हती. म्हणुन काय गप्प बसतोय होय आम्ही?. मुंबईच्या मॅचेस बघायचा जुनुन सवार असायचा आमच्यावर. त्यातल्या त्यात नेरुळला आमची पसंती असायची. एक्सप्रेस हायवेने गेले की अगदी जवळ पडायचे नेरुळ. मॅच पहायची तर हौस पण तिकीटे कशी काढायची?? मोठा गहन प्रश्न असायचा. सगळी चक्रे फ़िरवल्यानंतर एक धागा जोडलाच आम्ही. नेरळचे स्टेडीयम DY Patil कॉलेजचे, पिंपरीत पण DY Patil कॉलेज आहे. भुमितीतले समीकरण वापरले. DY Patil कॉलेज= IPL मॅच. म्हणजे पिंपरीतील कॉलेजचा काहीतरी संबंध असणारच याच्याशी. संदीप आहेर कडुन अभय कोटकरांचा नंबर घेतला.
सुनील मनोहर गावस्कर, भारतीय क्रिकेट मधले एक वलयांकित नाव, जागतिक क्रिकेट मधले वलयांकित नाव असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हिंदुस्थानातच नव्हे तर जिथे कोठे क्रिकेट खेळले जाते, तेथे हे नाव फार आदराने घेतले जाते. आज जसे सचिन ने काहीही केले (नाही केले) तरी विक्रम होते, तसे एक काळ सनी चे होते, शतक केले तर विक्रम, झेल घेतले तरी विक्रम, कसोटी खेळले तरी विक्रम, म्हणुन त्यांच्या नावा आधी विक्रमवीर ही उपाधी त्यांना देण्यात आली. माझ्या पाहण्यामध्ये त्यांच्या एव्हढे तंत्रशुध्द फलंदाजी करणारा दुसरा कुणी फलंदाज पाहायला मिळाले नाही.
भारता मध्ये क्रिकेट हे धर्म आहे आणि काही क्रिकेटर्स ना देवत्व प्राप्त आहे. भारतात रुढार्थाने क्रिकेट लोकप्रिय झाले ते १९८३ साली आपण विश्वचषक करंडक जिंकल्यानंतर, त्यापुर्वी ही लोकं क्रिकेट चे सामने आवर्जुन पाहायचे व एंजॉय करायचे, पण १९८३ नंतर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरी मध्ये खास करुन एक दिवसीय सामन्यां मध्ये खुपच सातत्य होते.
प्रस्तुत लेखात आपण भारतीय क्रिकेट संघाची १९८३ सालानंतर बदलते रुप पाहुया. १९८३ नंतर ते आजपर्यंत आपल्या संघा मध्ये नेहमीच वलंयांकित आणि अनुभवी चेहरे होते, त्याचे आढावा आपण घेऊ.
१९८३ चा विश्वविजेता संघ आपण घेऊ :-
सुनील गावस्कर
कृष्णमचारी श्रीकांत
पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...
गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.
आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
जेवणात मीठ नसेल तर कस होईल?? किंवा एखाद्या गाण्यात हवा हवासा तबल्याचा ठेकाच नसला तर? किंवा आवडत्या भेळेत नेमकी खजूर चिंचेची चटणीच नसेल तर कसं वाटेल?
TV वर match बघताना सचिन किंवा लारा किंवा सौरव यांनी मारलेल्या उत्तुंग षटकारावर
He hit that high in the air.. oh thats a bigie !! असं रोमांचित करणारा चीरकणारा आवाजच नाही आला तर? किंवा वासिम अक्रम च्या सुंदर in swinger वर कुणी out झाल्यावर oh beautifully bowled ,wonderfully bowled अस कुणी ओरडलच नाही तर?
Oh great shot, beautiful shot wonderful shot..
ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!