चलो सिडनी ! (IND vs BAN - World Cup 2015)
~ ~ चलो सिडनी ! ~ ~
क्रिकेट
~ ~ चलो सिडनी ! ~ ~
साखळी फेरीतील शेवटचा झिंबाब्वेविरुद्धचा सामना म्हणजे मॉकटेलच्या ग्लासाच्या कडेवर लावलेल्या लिंबू/ संत्र/ मोसंबीच्या चकतीसारखा निरर्थक होता. कुठल्याही निकालाने कुणालाही कसलाही फरक पडणार नव्हता. पण खादाड आणि महाकंजूष धोनीला ती चकतीसुद्धा चोखून खायची होती. त्यामुळे त्याने संघात कुठलाही बदल केला नाही. आत्तापर्यंत बेंचवर बसून राहिलेल्या भुवनेश्वर, बिन्नी आणि अक्षर पटेलच्या जागा 'थ्री इडीयट्स'च्या पोस्टरवरच्या आमिर, माधवन आणि शर्मनच्या जागांसारख्या झाल्या असल्यास नवल वाटू नये.
विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
सदतिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कोहलीने केव्हिन ओ'ब्रायनचा चेंडू सीमापार टोलवला आणि आयर्लंडविरुद्धचा सामना भारताने जिंकला. हा जो विजयी फटका होता, तो फटका संपूर्ण सामन्याचं सार सांगत होता. त्या षटकातील सगळे चेंडू ओ'ब्रायन ऑफ स्टंपबाहेर टाकले. फक्त सहा धावा विजयासाठी हव्या होत्या, पण ह्या सहा धावा सहजासहजी द्यायच्या नव्हत्या म्हणून. पण कोहलीने काय केलं ?
'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं.
२४ फेब्रुवारी २०१०.
पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी बदडून काढलेली आणि दुसऱ्या सराव सामन्यात अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचेही पूर्ण १० बळी घेता आले नाहीत, भारतीय गोलंदाजीची गेल्या काही महिन्यांतली कामगिरी पाहता, सराव सामन्यांमधली ही किमया आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. हे दोन्ही सराव सामने भारतासमोर विश्वचषक स्पर्धेत पुढे काय वाढून ठेवलं आहे, ह्याची कल्पना देणारे होते. सराव सामन्यांतून कसलाही जास्तीचा आत्मविश्वास न मिळवता आणि त्याऐवजी एक जोरदार 'फॅक्ट चेक' घेऊनच साखळी फेरीतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आला.
हा लेख आधीच लिहिला होता. पण प्रकाशित केला नाही कारण सामन्याच्या निकालावर माझा पुढील उत्साह अवलंबून असणार होता. पाकिस्तानसोबतच्या सामन्यानंतर मला वेळ मिळाला नाही, आज मिळाला आहे, म्हणून प्रकाशित करतो आहे. ह्यानंतर अन्युक अरब अमिरातीसोबतच्या सामन्यापूर्वी भारत-पाक व भारत- द. आफ्रिका ह्या सामन्यांवर लिहून बॅकलॉग भरून काढण्याचा विचार आहे.
आजपर्यंत क्रिकेट च्या इतिहासामध्ये फक्त चारच खेळाडू एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक करू शकले आहेत .
सचिन तेंडुलकर
वीरेंद्र सेहवाग
रोहित शर्मा
ख्रिस गेल .
इथून पुढील काळात असे किती आणि कोण कोण खेळाडू द्विशतक करू शकतील ?
आपले मत आणि प्रतिक्रिया कळवा - क्रिकेट च्या जनकारापैकी कोणाचा अंदाज बरोबर येईल याची चर्चा हि आपण याच धाग्यावर करुत.