सचिन तेंडुलकर - We will miss you like anything

Submitted by सत्यजित on 15 November, 2013 - 01:43

खर तर मला अजिबात पटत नाही कुठे काही झाल की कविता खरडावी, पण आजचा दिवस खरच स्पेशल आहे, आणि मी स्वतःला आवरु शकत नाही, आजचा दिवसच मित्रां बरोबर बसुन जुन्या आठवणीनां उजाळा देण्याचा... सचिनच्या सेंडऑफ पार्टीचा... दहावीच्या सेंडऑफ नंतर हा आजचा सेंडऑफ जेंव्हा नक्की माहीत असत आता ही मज्जा पुन्हा नाही...

सचिन सॉरी यार आज खरच हळवा झालो...

सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता...

आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला

तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो

दुडूदूडू पावलांची चिंता
फक्त आईच्या मनाला
सारा देश तुझी आई होतो
तू लागलास की खेळायला

पदकांचेही शतक
शतकांचेही शतक
कौतूक तुझं पहातं रहावं
तू खेळत रहावंस अथक

कुणी खुळे विचारतात
देव कधी का पाहीला?
अहो परवाच नाही का...
टीम इंडियाने त्याला विश्वचषक वाहीला

-सत्यजित.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.