तू ही त्यातला एक शहाणा आहे कौतुका

Submitted by कौतुक शिरोडकर on 5 February, 2012 - 08:57

’मीच बरोबर’ असले दावे करताय का फ़ुका
कधी कुपाच्या बाहेर सुद्धा यावे मंडुका

जरा पेटता माबोवर लेख, ललित वा गझला
काडी घालून तिथे लावती वैचारिक थुका

किती करी आवाज रिक्षाचा प्रतिसादापूर्वी
पुन्हा धाग्याला वर आणती होऊनिया मुका

डुआय होऊन नांदती बाफाबाफांवरती
दुजा येता डुआय कुणी... त्यास सोडेना सुका

माझी कविता सदा ग्रेट... आहे मीच सम्राट
उर्मट अधिकाराने दाखवी दुसर्‍यांच्या चुका

सदा तयारी जमीनदोस्त करण्यास इतरांना
कशा शमाव्या मायाजाली प्रसिद्धीच्या भुका

कुणास ठावे कधी कुणाच्या निशाण्यावर कोण
कैक शिकारी सज्ज खडे सरसावून बंदुका

('माय'बोली वर काढशी 'आय माय' दुसर्‍याची
अरे लेकरा अर्थ भलता का लावी शीर्षका)

पिंडा पिंडा हौस दुजाचा पिंड मांडण्याची
तू ही त्यातला एक शहाणा आहे कौतुका

(कणखरांची गझल फारच मागे गेल्याने त्याची लिंक देतोय.)

गुलमोहर: 

'माय'बोली वर काढशी 'आय माय' दुसर्‍याची
अरे लेकरा अर्थ भलता का लावी शीर्षका

फटकार लावली कुणीतरी. मस्तच !

फटकार लावली कुणीतरी. >>>> काय राव ? वृत्त, मात्रा, का ला का लावून इतक्या मेहतीने विडंबन पाडलय. कुणीतरी म्हणून आमचं क्रेडीट का घालवताय ? Lol

कुणीतरीच म्हणायचं रे
कारण वाईटपणा घेऊन कान टोचायचं काम करायला पण तुझ्यासारखाच पाहीजे. आम्ही मुळात भित्रट त्यात व्याध नक्षत्र नांदली काही ठिकाणी.. आपलंही असं काही होऊ नये म्हणून तेव्हापासून गपगारच पडलो. म्हणूनच अभिनंदन !

कौतुक, तुझं या विडंबनासाठी किती रे करु कौतुक Happy प्रचंड, लय भारी, येक नंबर झालंय भौ!! नुसतं सोललेलं नाही, चामडी वाळत घातली आहेस दोरीवरती!!!!
किरण्यकेलाही १०१% अनुमोदन.

>>डुआय होऊन नांदती बाफाबाफांवरती
दुजा येता डुआय कुणी... त्यास सोडेना सुका

जबराट. काहींचा दुतोंडीपणा उघडकीला आणला आहेस.

स्वतःला सोयीच्या डुआयड्यांशी गप्पा
विरोधात जाताच म्हणतो झापा झापा Proud

शुभे, माझं सोड. वाचणार्‍यानी मनाला लावून घेतलं तर मणामणाचं ओझ कमी होईल इथलं. म्हणजे सर्वरवर जास्त ताण पडणार नाही. Happy

वाचणार्‍यानी मनाला लावून घेतलं तर मणामणाचं ओझ कमी होईल इथलं.
>>>
अस झालं तर उत्तमच आहे. नाहीतर बघ ड्युआयच यायचे ड्युआयड्यांना शिव्या घालत Lol

कुणी तरी टार्गेट असावं का ?
काहीतरी सुंदर वाचायला मिळेल ही अपेक्षा होती.

(बरेचदा वाचनात येतं त्यावरून कुणाबद्दल तरी इथं नेहमी मत्सर, हेवा दिसतो. एखाद्याला गोळी घालण्यापूर्वी त्याला वेडा ठरवा अशा अर्थाची एक म्हण आहे ना ?)

जी निलम, "इथ" म्हणजे? माझ्या माहितीप्रमाणे तरी कौतुकने कुणाला टार्गेट केलेलं नाही आजपर्यंत तरी Happy
गमतीगमतीत काढलेल्या चिमट्यात वैयत्तिक आकस दिसणे यासारखे दुर्दैव नाही.
रच्याकने, ती म्हण, "If you want to kill a dog, call it mad" अशी आहे.

धन्यवाद मंदार. नीलमजी, तसा कुणी एक टार्गेट नाही. काही थोडा टारगटपणा करतात हे त्यांच्यासाठी. तसा हाही एक टारगटपणाच आहे म्हणा. Proud