Submitted by पाषाणभेद on 7 March, 2012 - 18:09
का? का? का?
पानांनाही कधी का येतो गंध
फुलासारखे हुंगून होण्या धुंद
पाण्याला कधी चढते निळाई
जंगलात का असते हिरवाई
रंग फुलांचे इतके का आगळे
पाहून असे का होते ते नकळे
डोंगरावर ते वृक्ष उभे का
सावली देण्या ते तेथे का
आकाशात ढग का जमून येती
आता येथे मग कोठे जाती
वारा भणाण उगा का वाहतो
"की, मी येथे आहे" असे सांगतो
हा मी एकटाच का कधीचा आलो
येथला नसूनही का येथलाच झालो
- पाभे
गुलमोहर:
शेअर करा
कमालीची सुंदर कविता.
कमालीची सुंदर कविता.
(No subject)
छानै!!
छानै!!
छान आहे. 'विवा' मधल्या
छान आहे. 'विवा' मधल्या गाण्याची आठ्वण झाली, पण शेवटच्या ओळी वेग़ळ्या आहेत.
पाषाणभेदजी: दुसरी ओळ तपासाल
पाषाणभेदजी: दुसरी ओळ तपासाल का? पूल की फूल?
अनेक प्रश्न पडतात ही कल्पना
अनेक प्रश्न पडतात ही कल्पना चांगली मांडलेय.
पण अखेरीस १-२ कडव्यात उत्तर दिलं असतं तर .......
chaan
chaan
मस्त
मस्त