चांदण्यात फिरतांना

भांडणात पडतांना...

Submitted by गोगो on 7 March, 2012 - 10:53

नमस्कार,
विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा अभिप्राय नक्की कळवा.
स्फुर्ती: (अर्थातच http://www.maayboli.com/node/33279)

भांडणात पडतांना
माझा धरलास हात
गधड्या घर आवर रे सावर रे
धड वाग......

थकलेल्या डोळ्याना
अरे आवरेना नीज
दूर कामे खुणावत
पडली सारी कितीक
ह्या इथल्या कामवाल्या दांड्या किती मारतात

सांग कशी तिजविनाच
कामे करू भारंभार
कशी तारांबळ होई
अन नवरा कामचोर
घर-ऑफिस मीच बघते, मीच जाते बाजारात

गुलमोहर: 
Subscribe to RSS - चांदण्यात फिरतांना