चांदणे ह्रदयात माझ्या...

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 February, 2012 - 11:57

स्वर्ग जर आईचपाशी...
का फिरु काबा नि काशी ?

चांदणे ह्रदयात माझ्या...
सख्य ना तारांगणाशी

पार केले शिखर,..कळले..
सौख्य होते पायथ्याशी

'कोण तो, मी कोण त्याची?'
प्रश्न अडतो उत्तराशी

पेटता वैशाख-वणवा..
बहरतो गुलमोहराशी

मी तुझी अन तूच माझा...
काय घेणे या जगाशी ?

मनगटावर भिस्त ठेवू...
दैव पडते तोंडघाशी

गझल अंकुरते ’प्रिया’ पण...
झगडल्यावर वास्तवाशी

-सुप्रिया.

गुलमोहर: 

पार केले शिखर,..कळले..
सौख्य होते पायथ्याशी>> कोणते सौख्य? पांढरे व गुलाबी आईसक्रीम का? Lol (दिवा)

सर्व शेर आवडले, चांगली गझल

सुप्रिया
'कोण तो, मी कोण त्याची?'
प्रश्न अडतो उत्तराशी
गझल अंकुरते ’प्रिया’ पण...
झगडल्यावर वास्तवाशी ....या सह संपूर्ण गझल आवडली.

छान