Submitted by A M I T on 1 March, 2012 - 00:44
सुप्रियाताईंच्या 'चांदणे ह्रदयात माझ्या' या गझलेचे स्वैर विडंबन.
विदेशी जर कुणी फुकटात पाजी
का पिऊ मी ती स्वस्त देशी?
वांगं केलयसं की कालचीच शेपू
कशाला करता उगा चौकशी?
परवा म्हणाली, "कामवाली ठेवू."
कळेना कुठे शिंकली माशी
तुमच्या हाती जादू असता
कशाला हव्यात गंगा नि काशी?
आणण्यास साखर कंटाळा केला
म्हणे, पहा ते शेजारचे जोशी..!
कशी मिळाली ही बायको नशीबा
कुठला गण हिचा नि कुठली राशी?
ज्योतिष्यास पुसला उपाय जेव्हा
म्हणाला, तुज आहे तुजपाशी..!
संतापाचा आता उद्रेक झाला
भोसकावी हिला की लावावी फाशी?
* * *
गुलमोहर:
शेअर करा
प्रयत्न चांगला आहे पण शेवट
प्रयत्न चांगला आहे पण शेवट नाही आवडला
महेश +१
महेश +१
म्हणे, पहा ते शेजारचे
म्हणे, पहा ते शेजारचे जोशी..!....>>>:हहगलो:
संतापाचा आता उद्रेक
संतापाचा आता उद्रेक झाला
भोसकावी हिला की लावावी फाशी?
नो...नाय...नेवर>>>>>>>>>