अंगत पंगत

Submitted by असो on 25 January, 2012 - 08:51

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमवा हसरी अंगतपंगत
हे क्षण जाता उरते काय
घ्या जगून क्षण भंगुर रंगत

सोपे किती हे सूत्र सुमंगल
कळते परि का घडते दंगल
शब्द शस्त्र का येती परजत
कसली अंगत कसली पंगत

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमता पंगत जाते रंगत
षडरिपुंची सोड ना संगत
जमवा हसरी अंगतपंगत

अनिल

सोनवणे साहेब कविता आवडली पण खालील कडवे मी विचार करतोय तसेच आहेका?

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमता पंगत जाते रंगत>>>>पंगत जमली रंगत आली(मला वाटते),असपण होऊ शकत्>पंगत जमली
...................................................................................................रंगत भंगली
षडरिपुंची सोड ना संगत>>>>>षडरिपुंची सोडुनी संगत
जमवा हसरी अंगतपंगत

क्षण दो क्षणांची साथसंगत
जमवा हसरी अंगतपंगत
हे क्षण जाता उरते काय
घ्या जगून क्षण भंगुर रंगत >>> मस्तच ! थोडक्या शब्दात खुप काही. Happy