रात्रीचे दहा वाजतात

Submitted by Kiran.. on 23 January, 2012 - 11:42

रात्रीचे दहा वाजतात आणि
सामसूम होते
गुलमोहर मान टाकतो
हितगुज वरची कुजबुज
ऐकू येईनाशी होते
गप्पाष्टकांना जाळ्या चढतात
आणि वर्दी येते..
जेवायची पानं वाढली जातात
तर कुठे चालू असतात
टीव्हीवरच्या मालिका
आणि कुठे कुठे
फोनवरच्या गटगगप्पा
काही चोरटे समस
इकडून तिकडे पास होतात
आणि काही..
किबोर्ड बडवण्यात दंग होतात..
उद्याची ती, बरं का, खानेसुमारी असते
पहिल्या पानावर येणा-या
त्सुनामीची तयारी असते..

वीररसाठी असतात इथे
कुरूक्षेत्रं आणि पानिपतं..एव्हरग्रीन
तुटलेल्या गदांची दुरूस्ती होत असते
नि गंजलेल्या तरवारींना तेल चढत असते
खिंडीमधे कापावा शत्रूला कसा
योजना ही रात्रीत बनत असते

असे थोर थोर सारे गुंगले असताना
काही मंद उथळ मात्र
झोपा काढत असतात
हम दो, हमारे दो
यातच दंग असतात...

अस्स चालतं का हो ?
सांगा बरं..

- Kiran

अस्स चालतं का हो ?

कै तरीच काय ?
आम्ही आतडी पिळवटून, रात्रीचा दिवस नि दिवसाची रात्र करून, डोळ्यांची खाचरं करून, कापरासारखं जळून, तीळ तीळ मरून कविता करायच्या नि हे असं वागणं शोभतं का ?

बरं झालं वाचा फोडलीस !

ह्म्म्म ....
पडदा पडल्यावर
पडद्यामागचं नाट्य
मजेदार रंगवलंय....... Proud

किरण, Lol मज्जा आली वाचुन.
आधी मला वाटलं आपल्यासारख्या निशाचरांवर कविता केलीस का जे १० वाजता लॉग इन करतात Wink

आले वाट्टं प्रतिसाद >>> वाईट्ट म्हणायच की काय Proud

सब जाणेमाणे ही लग रहें है ! >> मै तो नयी हु ना Uhoh

आपल्याला तर आवडली Happy

अस्स चालतं का हो ?>>>>> किरण ला शोधत होतो, कपाटात बसलेला सापडला. विचारल काय करतोयस? तर म्हणाला " चिंता करतो मा.बो. ची!! " Happy

मस्तच.

Pages