माझिया जीभेला........

Submitted by सस्मित on 16 January, 2012 - 06:47

'माप्रिप्रिक' ह्या 'काहीच्या काही' मालिकेच्या टायटल साँगच्या चालीवर.

घेउन येशी रोज तु
दुधी, वांगी अन् भोपळे
जीभेवरी ही माझ्या ग
दोडक्याचीच चव रेंगाळे
अ‍ॅसिडीटी ही वाढत आहे
खाउन चणा वाटाणा
माझिया पोटात अन्न पचेना........

रोजच खातो भाजी अळणी
करपट पोळ्या डाळीचे पाणी
आईच्या हातची चव आठवे
तिला सांगावा धाड ना
माझिया जीभेला चव कळेना..........

करुनी हद्दपार दोडकी नी वांगी
शिजव कधीमधी चिकन तंदुरी
कधीतरी तु दया करुनी
मटण रस्सा कर ना
माझिया मनाला भोपळा भावेना........

मुग नी मटकी काळा वाटाणा
ढवळे पोटात अंगी लागेना
कशा मी सांगु तुला ग राणी
माझ्या ह्या भावना
तुला ग राणी नॉनवेज का आवडेना?

माझिया जीभेला चव कळेनाsssssssssssssssssssss

रोजच खातो भाजी अळणी
करपट पोळ्या डाळीचे पाणी
आईच्या हातची चव आठवे
तिला सांगावा धाड ना
माझिया जीभेला चव कळेना..........जो तो ऊठतो आणि बायकोच्या जेवनावर घसरतो,जस काय यांच्या मातोश्री दररोज सुग्रास जेवन करून घालत होत्या,(अशी माझी बायको म्हणते).

अरे वा!
पोट भरलं वाचुन

ही कोणती मालिका आहे हो
मी नाही ना ऐकलं कधी????