काहीच्या काही कविता

चापट गालाले लागते

Submitted by जीएस on 26 November, 2011 - 10:16

'Prediction is very difficult, especially about the future' - Neils Bohr

रांग...

Submitted by Kiran.. on 26 November, 2011 - 02:08

सगळीकडे रांगा लागल्यात

जन्मासाठी, जगण्यासाठी
आणि हारून मरण्यासाठी..

रांगांनी नैराश्य आलं म्हणून
जोतिषाच्या दारी
गंडे ताईतावाल्याच्या दारीही
रांगाच रांगा..

मंदिराच्या रांगेत माणसं
आणि बाहेर मात्र
मुंग्यांची लागलेली रांग

एकेक ग्रॅम देवपण वाहून नेणारी

तेव्हाच
धडधाकट शरीरावरचं शीर गळून
मानसिक अपंगत्व येत चालल्याचं जाणवलं

आणि मुंग्यांच्या रांगेत शिरलो ..!!

- Kiran

आभाळ

Submitted by Kiran.. on 26 November, 2011 - 01:58

(स्फुटं )

जमिनीला पाय लावून
आभाळ कवेत घेताना
टाचा उंचच करत गेलो
आणि
आभाळाविनाच पुन्हा
जमीन शोधतांना..

तू खांद्यावर हात ठेवलास
आणि आश्वासक हसलीस

आजवर तेच तर पुरून उरलंय गं !!

- Kiran

छोड ना यार....!!!

Submitted by Kiran.. on 18 November, 2011 - 12:37

चांदण्यांच्या दुधाची बासुंदी
त्यात बुडालेला चंद्र
सकाळ होती ना ती.. कि
पहिली कोजागिरीची रात्र
टिमटिमते होते तारे कि
लाजरे उघडमिट्ट नेत्र ...
चांदभूली होती किरणे कि
थरथरती सलज्ज गात्रं..

उफ्फ आज मात्र ..
ईएमआयची धुंदी
नि कोळसा कोळसा चंद्र
उगाच दमून उलटलेली
आणखी एक रात्र..

चोवीस तास फेसबुकावर -

Submitted by विदेश on 15 November, 2011 - 11:16

चिंता एक सतावत आहे
मुलगी माझी उपवर आहे

हुंडा मागणारा चालेल
गाडी नसणारा चालेल

पोटापुरता कमावणारा
नोटासाठी ना झुरणारा

आय टी वालाही नको
फायटी वालाही नको

स्वैपाकातहि रमणारा
हौस मुलीची पुरवणारा

असा नवरा तिला हवा
असा कुठे मी शोधावा

कारण माझ्या डोकेदुखीची
एकच अट आहे तिची...

' - चोवीस तास फेसबुकावर
कायम व्हावा तिचाच वावर !'

----- वेड्याच गाणं ------

Submitted by Ramesh Thombre on 15 November, 2011 - 00:40

तो तसा पागल आहे
डोळ्यावर त्याच्या गॉगल आहे
कधी कधी हसत नाही
रिकामाही बसत नाही.

हातात घेऊन एक काठी
वन-वन फिरत असतो
शांत सावलीत कधी बसून
उन्हा सारखा झुरत असतो.

त्याची कहाणी कळत नाही,
धागा सुद्धा मिळत नाही.

जाता जाता तो एकदा
सिनेमाला जाऊन आला.
येता येता तशीच एक
मैत्रीण सोबत घेऊन आला.

ती हि तशीच पागल असते
मधून मधून उगीच हसते .
हसनारीही पागल आहे
दिसणाराही पागल आहे !

दोघांची आता यारी आहे
ती त्याची प्यारी आहे .
दोघे खूप फिरत असतात,
चौपाटीवर चरत असतात.

तरीही तो पागल असतो
डोळ्यावर त्याच्या गॉगल असतो
कधी कधी रुसत नाही
मान लटकून बसत नाही.

आता त्याची ओळख पटली,

उत्सव

Submitted by Kiran.. on 5 November, 2011 - 13:45

आभाळाएव्हढं अजस्त्र गिरमिटी यंत्र
पिसून काढतंय आयुष्यातले क्षण आणि क्षण
रखरखीत वाळूसारख्या पसरलेल्या पिठात
उगात रेघोट्या मारतंय छिन्नविछिन्न मन
अथक
निरर्थक ..!

रेघांचे अनाकलनीय आकार
एकमेकांत मिसळत जाणारे
अनोळखी वाटता वाटता
हलकेसे ओळखीचे वाटणारे
वेडे
वाकडे...

कुठेतरी अंमल सुरू होतो
दोन पेग निराशेच्या फेसाचा
अधुरी धुंदी साजरा करते
उत्सव अकथित कहाण्यांचा
सुस्त
निद्रीस्त

आणि उत्सवानंतर किना-यावर
खच पडतो सर्वत्र
फुटक्या बाटल्यांचा
खरकट्याचा

मी
रडतो पडतो
उठतो फुटतो
बसतो हसतो
आवरतो
सावरतो

तेव्हां..
झाडूवाल्याच्या शिव्या अव्याहत चालू असताना

काय रे देवा.

Submitted by pseudorandom on 3 November, 2011 - 11:08

संदीप खरेंच्या "काय रे देवा " स स्मरून ,

ती ४ दिवसांसाठी गावाला जाणार,
मी तिच्या वाटेवर डोळे लावून बसणार,
फोन कडे बघण्याची वारंवारता वाढणार,
आणि ती ब्लांक स्क्रीन हिरमोड करणार,
आणि यातल्या कशाचाही तिला गंध नसणार,
काय रे देवा.
मग तिच्या आगमनाचे वेध आम्हीच लावून घेणार,
मग दिनदर्शिकेची आवर्तनं होणार,
घड्याळात डेका सेकंदांची calibrations होणार,
मनातली हुरहूर अन आठवणींची आर्तता असह्य होणार,
आणि यावर ती आमच्या दिवास्वप्नात फक्त स्मित करणार.
काय रे देवा.
ते स्मित दिवसा कोकणस्थ अन रात्री देशस्थ भासणार,
मुळात ते मात्र कऱ्हाडे असणार,

आण्णा चूसे गण्णा...

Submitted by किरण कुमार on 2 November, 2011 - 04:07

आण्णा चूसे गण्णा...

सकाळी सकाळी घालूनी लूंगी,धंद्याची वाजवे पूंगी
टायरवाला अण्णा आपला करतो तयारी जंगी

होता फूसफूस टायर, लावयास ठिगळे तयार
हाती घेवूनी पान्हा आण्णा म्हणे खोला ना

अण्णा हातोडा मारी वरतूनी फूगली ढेरी
अण्णाची पोरगी भारी टायरासारखी काळी काळी

लाईट गेली अण्णा दिसेना खिळे टाकूनी ट्रक फसेना
कुठे गेला एन्ना रास्कल्ला अजून त्याचा धंदा बसेना

अण्णा सांगतो सगळ्यांना माझ्यासाठी इडली आण्णा
कुणी नाही आणली तरी आण्णा आपला चूसे गण्णा
--------

गुंता होतो..

Submitted by अखिला on 31 October, 2011 - 11:37

तू अजुनही माझा आहेस का??
तू अजूनही तसाच आहेस का?
तुझं-माझं नातं तसच आहे का?
सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता ..
गुंता होतो..
खूप गुंता होतो..

तुला भोवताली शोधताना..
धुक्यात हरवलेली ती वाट शोधताना..
जीव एकवटून तुला आवाज देताना..
नि:शब्द शांततेत तुझ्या एका 'ओ' ची वाट पाहताना..
गुंता होतो..

गुंता होतो माझ्या मनाचा..
तुझ्या सावल्यांसोबत भरकटत जाणार्‍या,
माझ्या भावनांचा गुंता होतो..
तुझी वाट पाहता पाहता..
दिवस कधीच ढ्ळलाय,
सांज दाटून आल्याव्रर..
गुंता होतो..
तुझ्या आठवणींसोबत मोहोरलेल्या..
संवेदनांचा गुंता होतो..

त्या गुंत्यात गुरफटून मी..
हरवून जाते..

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता