काहीच्या काही कविता

होता, नव्ह्ता..

Submitted by चाऊ on 20 October, 2011 - 08:47

स्तब्ध जग, स्पर्शही, होता - नव्हता,
कुडीतही प्राण जणू, होता - नव्हता,
निरवतेचा आवाजही मनी, होता? नव्हता!
अंधाराला गंध, उजेडाचा, होता - नव्हता
भाव मनातला, कळला होता? नव्ह्ता?
अस्फूट होकारही होता - नव्हता,
सरली निशा, दिन उघडला होता - नव्हता,
खरच कुणी जिवलग सोबत होता? नव्हता?
मंद झुले झुला, झोका होता - नव्हता,
गाली आसवांचा ओलावा, होता! नव्हता?
कवडसा स्मिताचा, किनारी ओठांच्या, होता -नव्हता,
विश्वाचाच पसारा जणू, होता - नव्हता !

तू कविता करायला लायक आहेस?? - का का क

Submitted by बेफ़िकीर on 17 October, 2011 - 09:22

तुला आहेत का गटगमधून मिळालेले साठ मित्र?

एकोणसाठ तरी?

तुला आहेत का रिक्षा फिरवण्याच्या लकबी माहीत?

निदान हातगाडी तरी?

तुला दिसतो का हा निसर्ग??

हे ढग, ही संध्याकाळ, हे झरे, या सुबक लाल मातीच्या ...... वा... टा

... ही ऊनभरली कोवळाळलेली आणि पश्चिमाळळेली अडाणचोट परावलंबी बुभुक्षित किरणे...

तुला येतात का विपूत दिवसाला एक्काहत्तर स्तुत्या

निदान सत्तर तरी??

नाही????

किंवा तुला इतरांच्या विपूत अशा स्तुत्या डकवता येतात???

निदान खोट्या आणि वेगळा मोटिव्ह असलेल्या तरी??

नाही???

.....धुंद.....

Submitted by अन्नू on 17 October, 2011 - 08:31

rose image.jpg

इतकी जवळ येऊ नकोस कि माझी सवयच होऊन जाईल,
पाहू नकोस अशी कि प्रेम होऊन जाईल;
तुझ्या या भावनांना तू मनामध्येच राहू दे, नाहीतर-
ओठांच्या या गर्म श्वासांना पुन्हा एक बहाणा मिळून जाईल.........

-तुझी एक गोड आठवण.

सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??

Submitted by टोकूरिका on 12 October, 2011 - 23:45

सदानकदा कुरवाळतेस असतेस
तुझ्या त्या अप्पलपोट्या मांजरी,,,,

सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??

दारामध्ये बांधून मला
घराची राखण कर म्हणतेस?
अन दुध सारं संपतं जेव्हा
तेव्हा मलाच जाब विचारतेस?
माझ्याच मालकिणीच्या घरात
मी करेन का गं चोरी??

सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??

तुझ्या गुब्ब्या मांजरींना कशी
प्रेमाने न्हाऊ माखु घालतेस
माझ्यात अन त्यांच्यात
तू एवढा फरक का करतेस??
आलो तेव्हा तुझ्या श्रीमंतीला पाहून
भाळलो मी,,,,पण आता वाटते सुखी असतो
जर गेलो असतो गरीबाच्या घरी

सांग कधी कळणार तुला माझी वफादारी??

बास! आता पेशन्स संपलाय माझा!
हा निघालो मी कायमचा!

कसं काय पाटिल बरं हाय का

Submitted by जागोमोहनप्यारे on 10 October, 2011 - 13:52

कसं काय 'पाटिल' बरं हाय का

कसं काय 'पाटिल' बरं हाय का
सांगा बरं हाय का
काल काय लिवलं ते खरं हाय का
खरं हाय का

काल म्हनं तुम्ही नेटावर गेला
दोनचार कविता ढापून आला
आज तरी वरिजिनल लिवलय का
सांगा लिवलय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का?

दुसर्‍याच्या कविता ढापणार तुमी
आयडिया तुमची लईच नामी
मूळ कवीचं नाव तरी खोडलय का
सांगा खोडलय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का?

की बोर्ड माऊसची किमयाच न्यारी
रेडाही रचतोय गा ज्ञानेशवरी
कॉपी पेस्टाशिवाय काही येतय का
सांगा येतय का
काल काय ऐकलं ते खरं हाय का?

गाढवानं पांघरलं वाघाचं कातडं
बेडकाच्या पोटात बैलाचं आतडं !

अय्या किती हो मनकवडे तुम्ही

Submitted by Sanjeev.B on 3 October, 2011 - 04:16

मित्रांनो आणि मैत्रिणिंनो,
कविता सुचता सुचता वात्रटिका लिहली आहे.

कधी नव्हे ते सौ ला विचारलं
जरा एक कप कॉफी मिळेल का
सौ चा चेहरा पाहुन मीच म्हणालो
साखर संपली असेल नै
सौ लगेच म्हणाली, अय्या किती हो मनकवडे तुम्ही

साखर आणायला पिशवी हातात घेता न घेता
तेच सौ चा चेहरा पाहुन मीच म्हणालो
संध्याकाळच्या कॉफी साठी दुध ही आणतो
सौ लगेच म्हणाली, अय्या किती हो मनकवडे तुम्ही

कॉफी चा घोट घेता घेता
सौ ला म्हणालो आज बेत काय आहे
सौ म्हणाली, आज मसाले भात करते
मी म्हणालो वाटाणे सोलुन द्यावं लागेल नै
अय्या किती हो मनकवडे तुम्ही

मसाले भात गिळता गिळता
चुकुन सौ शी नजरा नजर झाली

मुक्तछंद की..यमक..?

Submitted by के अंजली on 1 October, 2011 - 14:23

आयुष्य म्हणजे तरी काय..?

कविताच की!

मुक्त आणि बध्द..

तुझी काय नी माझी काय..

तू तुझा मुक्तछंद कसोशीने जपलास..

मला मात्र...

यमकातून नाहीच बाहेर पडता आलं...

नाहीच...........

दगडाची गोष्ट

Submitted by पाषाणभेद on 30 September, 2011 - 18:13

दगडाची गोष्ट

(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)

प्रास्ताविक:
निट बसा सगळे लक्ष द्या इकडे
एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे

आरंभ:
एक खेडेगाव असते
तिथे एक नदी वाहते

विषयविवेचन:
त्या नदीत असतो एक दगड
मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड
इतर दगड खुष असत
हा मात्र असतो सतत रडत

नायकाचे आत्मकथन:
"मी काही कामाचा नाही
कोणाच्या उपयोगाचा नाही
देव करण्याइतका मोठा नाही

शब्दखुणा: 

प्रयत्नशिल

Submitted by pseudorandom on 30 September, 2011 - 14:30

कितिहि वेळ सोबत असलिस तरि अजुन कहि वेळ तु सोबत असाविस अस वाटत,
आमच्या हावरटपनाच for loop हे नेहमिच infinity मध्ये असत,
तुला वेळ नसेल वाचन्यास म्हनुन स्वतहाशिच बोलतोय,
कदाचित तुहि वाचशिल कधितरि जानुन तुलाहि cc मध्ये ठेवतोय!

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता