टाटा मात्र नॉनो ची खिडकीही उघडत नाही ...

Submitted by संदीप आहेर on 26 January, 2012 - 23:49

हीरोचे अडले काहीच नाही
होंडा जरी नवे दालन बांधू पाही

शोधीत राहतो मी बुलेट संगीत कायम
गीत तीचे सुरु होता कानावर हात कायम

ब्रम्हांड मानते ती, मी मॅकेनिक नि पेट्रोलपंप
सार्‍या प्रदक्षिणाही त्या भोवतीच करते

रंगते इंडियन मेडची चर्चा ती
रॉक १०० सांगून कैक मुद्दे हमखास टाळतो मी

रागात मस्तकावर आभाळ महिन्द्र घेऊ पाही
टाटा मात्र नॉनो ची खिडकीही उघडत नाही

मूळ प्रेरणा : विजय दिनकर पाटील यांची सहज सुंदर कविता, http://www.maayboli.com/node/32169

रागवू नये.

शब्दखुणा: 

मस्त!!

काहीतरी वात्रटपणा करण्यापेक्षा हे बरे, त्यामुळे रागावण्याचा प्रश्नच नाही.