माझे जीवन 'खाणे'

Submitted by आशयगुणे on 28 January, 2012 - 11:04

माझे जीवन 'खाणे'....माझे जीवन 'खाणे'
व्यथा नसो आनंद असू दे,
प्रकाश नसो, तिमीर असू दे,
वाट लागो अथवा ना लागू दे,
'खात' पुढे मज जाणे.
माझे जीवन 'खाणे'....
...
कधी चुकवतो 'टैक्स' मुद्दामून
कधी लुबाडून, कधी फसवून
वंशजांना धनी बनवून
कधी 'खात्या'तून , कधी धाकातून
खूळखूळतात नाणे!

खा नेत्यांनो माझ्या संगे
धनावरी हा जीव तरंगे
तुम्च्यापरी माझ्याही 'खात्या'तून
साठे पैके हे 'काळे'

खा नेत्यांनो माझ्या संगे
धनावरी हा जीव तरंगे
तुम्च्यापरी माझ्याही 'खात्या'तून
साठे पैके हे 'काळे'>>>>>अपुर्ण आहे