प्रेमाचिया वाटे

Submitted by किरण कुमार on 1 February, 2012 - 02:50

काढूनिया वेळ, घालूनिया मेळ
खावयाची भेळ, सारस बागेची !!

घेवूनिया गाडी, करु मजा थोडी
असेल जरी जाडी, मैत्रिण आपूली !!

कोण असे शत्रू, कशासाठी भित्रू
पाळलेले कुत्रू, मैत्रिणीचा भाऊ !!

सौदा करु सस्ता, सिंहगड रस्ता
खावूनिया खस्ता, झुडूपाआड !!

किती प्रेम मोठे, खर्चालाच तोटे
आपटूनी डोके, आवरते घ्यावे !!

घेवूनिया कात्री, बदलावी मैत्री
दोन पॅक रात्री, घेवूनिया !!

प्रेमाचिया वाटे, टोचतात काटे
तरी जोश दाटे, उठल्यावरी !!

किकु

काढूनिया वेळ, घालूनिया मेळ
खावयाची भेळ, सारस बागेची !!

>>>> सारसबागेत असे हवे ना Uhoh

घेवूनिया गाडी, करु मजा थोडी
असेल जरी जाडी, मैत्रिण आपूली !!

>>>> बडा है तो बेहतर है ?? Biggrin

सौदा करु सस्ता, सिंहगड रस्ता
खावूनिया खस्ता, झुडूपाआड !!

>>>> Rofl

निव्वळ किकुक ...आपलं काकाक Rofl

काकाक लायक कविता.मस्तच.
हे किरण नावचं असं काहीतरी लिहायला कारणीभूत असाव्म.......>>>>>
काही दिवसापुर्वी किकुंची एक कविता काकाकवर आली होती ती त्यानी एका प्रतिसादात पळवली होती,