Submitted by के अंजली on 1 February, 2012 - 03:34
सुचतं खूप काही..
अगदी आतून..
मनाच्या तळातून येतं..
जाणीवांचे तरंग
हलकेच उठतात मनाच्या पृष्ठावर..
पण मध्येच मनाचाच एखादा
गरगर भोवरा
ढवळून जातो सारे अंतरंग..
गढूळ झालेला मनाचा चेहेरा मग
नितळ होता होत नाही.....
घिसापिट्या संवादांची
नुसती रेलचेल होते..
मनातल्या मनातच..
दाटून येतच मग..
धुमसत धुमसत..
तड लागली की
कोसंळतच..!
मग सारं कसं...
नितळ......!!
गुलमोहर:
शेअर करा
मनाची उलघाल चांगली व्यक्त
मनाची उलघाल चांगली व्यक्त झालेय कवितेतून...... कविता आवडली.
वा वा
वा वा
मस्त!!!
मस्त!!!
आवडली.
आवडली.
आवडली, छान आहे. ही का.का.क.
आवडली, छान आहे.
ही का.का.क. मधे का टाकली आहे?
आभार सर्वांचे! इतरांनी
आभार सर्वांचे!
इतरांनी आपल्या कवितेला काकाक म्हणण्यापेक्षा आपणंच म्हंटलेलं बरं नै का मंदार?
मला अतिशय आवडली, आत्ता
मला अतिशय आवडली, आत्ता पुन्हा वाचली.
मी ही पुन्हा वाचली
मी ही पुन्हा वाचली
मंदार_जोशी | 2 February, 2012
मंदार_जोशी | 2 February, 2012 >>>कवितांच खोदकाम चालू आहे वाटत.
मस्त!,...आवडली
मस्त!,...आवडली
छानच आहे, पण काकाक मध्ये
छानच आहे, पण काकाक मध्ये कशाला???????
निशब्द..!! भयानक सुंदर..!!
निशब्द..!! भयानक सुंदर..!! काकाक मधून हलवा आधी.
+1 Not supposed to be in kahi
+1 Not supposed to be in kahi chya kahi!!
धन्यवाद!
धन्यवाद!
अरे वा ! मस्तच कि
अरे वा ! मस्तच कि