एका दाण्यासाठी

Submitted by किरण कुमार on 9 February, 2012 - 02:10

आयुष्य लोटलेले ते खोट्या नाण्यासाठी
मग छंद लागे कसले भलते खाण्यासाठी

बाजार मांडलेला इथे अब्रुचा दुनियेने
तरीही आस तुजला खा-या पाण्यासाठी

ते वस्त्र टांगोनी खूंटी माज असाही चढतो
विसरुनी जगाला बसला तू धुंद गाण्यासाठी

संपोनि ताट सारे का भूक ही सरेना
तू लाचार जाहला रे त्या एका दाण्यासाठी

किकु

प्रगो
काय अर्थ लागला ? मला अजून नाही लागला

>>

तुम्ही पायरेट्स ऑफ कॅरेबियन ..पार्ट ३ पाहिला नाही का किरण्यकेराव.... त्यात आपला हिरो ...ज्यॅक स्पॅरो ...बिच्चारा एका दाण्यासाठी लाचार झालेला असतो ...त्याला उद्देशुन आहे हा शेर .
.
अहाहा अभिजात ग्रेसफुल कविता Happy

तुम्ही पायरेट्स ऑफ कॅरेबियन ..पार्ट ३ पाहिला नाही का किरण्यकेराव.... त्यात आपला हिरो ...ज्यॅक स्पॅरो ...बिच्चारा एका दाण्यासाठी लाचार झालेला असतो ...त्याला उद्देशुन आहे हा शेर .

अरे असं आहे होय ! म्हणजे आता पाकॅ - ३ बघणं आलं ही कविता समजण्यासाठी ( त्यातला एक शेर ).

किकुंच्या शेवटच्या प्रतिसादाचा काय संबंध आहे? बाप्रे! खूप दिवसांत हसले नव्हते. Proud
किकु, धन्स Happy

आयुष्य लोटलेले ते खोट्या नाण्यासाठी>>>>>> खोट्या नाण्यासाठी का बरं? काय येणारे त्यात?
मग छंद लागे कसले भलते खाण्यासाठी>>>>>>> भलते म्हणजे नेमके काय खाणार?
खोट्या नाणे देवुन भलती वस्तु खाण्यासाठी मिळते असा अर्थ आहे का ह्या दोन ओळींचा?

बाजार मांडलेला इथे अब्रुचा दुनियेने>>> दुनियेने ? कुणाच्या??
तरीही आस तुजला खा-या पाण्यासाठी?? खारे पाणी म्हणजे डोळ्यातले की समुद्रातले?
दोन्ही ओळीचा एकमेकांशी काही संबंध स्पष्ट होत नाही.

ते वस्त्र टांगोनी खूंटी माज असाही चढतो>>>>> ते वस्त्र म्हणजे कुठले?? माज कुणाला चढतोय खुंटीला की वस्त्र काढुन टांगणार्याला?
विसरुनी जगाला बसला तू धुंद गाण्यासाठी>>>>>> ??????
म्हणजे 'ते' वस्त्र खुंटीला टांगल्यावर विसरुन धुंद होउन तसेच बसुन गात आहे का?

संपोनि ताट सारे का भूक ही सरेना>>>>>>>>> भस्म्या झाला असेल.
तू लाचार जाहला रे त्या एका दाण्यासाठी>>>>>>>> नो कमेंट्स कारण पायरेट्स ऑफ कॅरेबियन ..पार्ट ३ नाही पाहिला.

(आज खुप वेळ आहे. अजुन कुठे सविस्तर प्रतिसाद देता येतील???)

"मी_कोल्हापुरकर" यांनी माबोवर येऊन २ तास ९ मिनिटे झाली नाहीत तोवर "एका दाण्याची" जी काही चिरफाड केली आहे त्याला __/\__