लाज

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2012 - 09:25

कपड्यातल्या मी ला
आज, मी अलगद सोडवलंय...

लाज टाकली!

गरज होती..

काती वर कपड्यांची पुटं
सक्त जडाऊ झाली होती...!
त्या पुटांनीच चार दिसात
उद्या माझा पिक्चर झोपला असता!

हे करताना,
कपड्याच्या आतून दडवलेले,
माझे काही दमदार पैलू मात्र दाखवावे लागलेत...

सगळेच सौदे मनासारखे कसे होतील?

झालेय मोकळी!
काहीशी सुटलेली- बरेच झेललेली...
स्वतःला टिकवत,
नवा जन्म स्वहस्ताने साकारलाय!

हे करण्यास भाग पाडलेल्यांनी
मात्र, उद्या येऊन
"तू पूर्वीची राहिली नाहीस" हे म्हणताना,

माझी लाज तेवढी पाहून जावी.

इति विद्या किंवा वीणा किंवा कॅटरीना किंवा..... एक नवा डर्टी पैलू.

तटी - हे विडंबन असेल तर मग कशाच... कवितेचं की ....... यावर लवकरच एक चर्चा घडणार. तयार रहा. Happy

विडंबन तर नक्कीच आहे.
सिनेइंडस्ट्रीतलं एक कटु सत्य असावं असं वाटतंय..

मी लाज सांडली,मी लाज सांडली
मी ''करिअर'' करण्यासाठी
मी लाज सांडली,मी लाज सांडली

Rofl

surprising, Mandar u just copy pasted vidipa's pratisad. Happy

सगळ्याच बाबी सांगायला किमान त्यांनी तरी लाज टाकली नाहीये >>> हे बेफि व्यवस्थित सांगू शकतील, नाही? की तिथेही तुमचा हस्तक्षेप चालतो? Rofl

>>तिथेही तुमचा हस्तक्षेप चालतो?

सगळीकडे "हस्त"क्षेप करायला मी म्हणजे काय तुम्ही आहे? Wink Rofl Proud Biggrin

सगळीकडे "हस्त"क्षेप करायला मी म्हणजे काय तुम्ही आहे?>> मी व्हायचा विचार जरी मनात आणलात तरी धाप लागेल तुम्हाला Rofl

>> मी व्हायचा विचार जरी मनात आणलात तरी धाप लागेल तुम्हाला

बरोबरे. स्वतःला इतकं खाली आणण्याचा विचार डेंजरच Rofl Proud

बरोबरे. स्वतःला इतकं खाली आणण्याचा विचार डेंजरच>>> म्हणजे वर जायचा विचार पक्का केलायत तर Rofl

धाप? Lol फारच विनोदी ब्वॉ तुम्ही. तुम्ही बालवाडीछाप विधाने करु लागल्यावर ती आम्हांस कशी पचणार?
बाकी पैलवानाची अक्कल तेवढीच Wink Light 1 Biggrin

काय आहे ना? फोनवर अशासाठी की नंतर पहाटे अडीच्ला उठून तुम्ही पोस्टी पुसून टाकाल, लोकांचा विरस होईल त्याने....... Rofl

फोनवर तुम्हालाही मजा येईल आणि आम्हालाही... लोकांचा प्रश्न नाही

Pages