मॉडर्न कविच्या व्यथा

मॉडर्न कविच्या व्यथा.....

Submitted by पुरंदरे शशांक on 4 February, 2012 - 04:43

मॉडर्न कविच्या व्यथा.....

फुटके तुटके शब्द आणून कविता केल्या चार
दोस्त सगळे चाट पडले, कसलं भारी यार........

GFला विचारतो मग, काय आणू सांग ?
चंद्र-तारे आणून देतो, नाऊ व्हॉट्स राँग ?

नाक मुरडून म्हणते हूं... कसले चंद्र-तारे
एक कोल्ड कॉफी साधी आणून दे ना रे

सगळ्या पोरी सारख्याच, यांना कळेल का कविमन ?
खायला-प्यायला द्या नुसते, वर प्रेझेंट ए वन !!!

कुठून पडलो फालतू सालं, फंदात या कवितांच्या ?
डॅडकडे मागू कसा पॉकेटमनी जास्तीचा !!!!

Subscribe to RSS - मॉडर्न कविच्या व्यथा