कविता

शहर आणि कविता

Submitted by vaiddya on 27 March, 2011 - 09:46

एक कविता असते
आणि
एक शहर असतं

शहराला दिसत नाही काहीही
दिसत नाही
ऐकू येत नाही
जाणवत नाही
वा नाही घेता येत वास शहराला .. कशाचाच !
कविता
शहराच्या खिजगणतीलाही नाही ..
दिपवून टाकणारा झगझगाट
कर्कश्य किंवा दबलेले सततचे आवाज
दुर्गंधी
किंवा
कॉंक्रीटचं आणि डांबराचं अंगावर चढलेलं सोरायसिस ..
या कशानेही शहर बधत नाही
वाढत राहाते ..

हे शहर वाढेल तितकी कविता खुंटणार आहे ..

कवितेला सर्वकाही
दिसतं
जाणवतं
खुपतं
टुभतं
सलतं ..
कारण जाणिवांनी - जाणिवांमधून कविता येते
ती सगळं
पाहू शकते
ऐकू शकते
जाणिवांत साठवत असते
श्वासांत वेचत बसते
म्हणूनच कविता
अपंग ठरते ..
या अनिर्बंध

गुलमोहर: 

छटा

Submitted by अज्ञात on 27 March, 2011 - 02:57

चाहूल कुणाची घेई मन कानोसा
ऋतु चंदनमंडित येई घेउन वळसा
ओहटी फुटे माघारी खोल तळाशी
वादळ गाभारी अन भवती जानोसा

लय मंथन हृदयी थरथर नव उन्मेषा
रिपु मोहमयी माने ना निमिष निराशा
आशेत उजाडे जीवन मिथक उषेचे
ओघळे स्वप्नमय दंवबिंदूत जिगीषा

रोमात समन्वय अगणित कृतिबंधांचा
यातना प्रेममय झुळुक वेदना रेषा
रंगात रंग शतरंगित छटा प्रभेच्या
देखण्या रागिणी ऋचा श्रृती वेदांच्या

..........................अज्ञात

गुलमोहर: 

भाषा ...!!

Submitted by प्रकाश१११ on 26 March, 2011 - 23:05

सगळ्या पक्ष्यांची भाषा एक असते
येथे, तेथे कोठेही
ह्या गावात
ह्या शहरात
देशात ,परदेशात ..!!

ह्या परदेशात त्याला पक्ष्यांचीच आपुलकी
त्यांच्या नजरेत तोच प्रेमळपणा
किंवा आपलेपणा
ती उडत असतात त्याच्या डोक्यावरून
तेव्हा ती किती आपली वाटतात
आपल्या गावची वाटतात
कोठेतरी आपलेपण असतो त्यांच्या नजरेत

पक्ष्यांची भाषा एक तशी प्रेमाची भाषा [?]
प्रेमात भाषा नसते
त्यात असते नजरेची जादू
शब्दकोश न बघता
अर्थ उलगडत जातो
त्या नजरेचा संदर्भ लागत जातो
आणि शप्पत आपण हरवून जातो ....

तिच्या प्रेमात तो
लवथवते तारुण्य
परक्या ठिकाणी परका
कोणी प्रेम देतोय

गुलमोहर: 

पुन्हा रात्र

Submitted by निनाव on 26 March, 2011 - 17:57

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं

असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं

झोपायची घाई असतेच कुणाला
ते स्वप्न पडायचं एक दार असतं

अजुनच बहरते रात्र सांगु? जेंव्हा
चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं

तु सोडले असावे केस मोक़ळे
असाच काहिसा भास असतं

एकटेपणाची सोबत लागते गोड
तारुण्याचं बोलकं पान असतं

मारतं मग कुणी चांदण्यांशीच गप्पा
तीच समोर असा ठाम विश्वास असतं

रात्रीच्या पांघरुणात एक मात्र कमाल असतं
अंधारात तिचं यौव्वन कसं साफ दिसतं

तु कुठे दिसली, काय बोलली, हसली
सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं

रात्रीचं पाघरुण असंच लाजवाब असतं

गुलमोहर: 

त्याचे गाव बेपत्ता असते

Submitted by कल्पी on 26 March, 2011 - 11:42

ती नेहमीच तर आठवाशी खेळत असते
खेळताना उगाच जुण्या चिंध्या वळत असते

रात काळी हवीहवीशी नेहमीच असे तिला
अमावसेला ती काळाची महीमा गात असते

उजाड रानात अनवानी फ़िरणे आवडते तिला
दुरवर नजर असते आणी काही गात असते

भर पावसात भरलेली नदी तिचीच होत असते
काट्यांची फ़ुले ओंजळीत भरुन अर्ध्य देत असते

हे जगणे तिचे, माझे काळीज कापत असते
मी नाही नाही करीत तिच्यात गुंतत असते

ऐकले काय अशी कुणाची प्रेमकहाणी केव्हा
का वाट बघावी तिने , त्याचे गाव बेपत्ता असते

कल्पी जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फसवे ऋतु निघाले...

Submitted by rutuved on 26 March, 2011 - 09:34

शोधू कुठे कसा मी..ना ठाव,संग त्याचा
वाऱ्यासवे उडाला आनंद अंतरांचा...१

होती उगाच खोडी अन माग सावल्यांच्या
पळत्या क्षणात सरला तो खेळ जाणिवांचा ..२

हसलो असे कितीही,ना शल्य दूर झाले
येत्या उन्हासवे ते पर्जन्य हि जळाले....३

असता अलभ्य ठेवा, वेळूत लुब्ध झालो
जनमानसात आता हरण्यास सिद्ध झालो..४

होती जरी कितीही माया सभोवताली
तू टाकलेस अन मी ,माझ्यासवे बुडालो...५

....ऋतुवेद

गुलमोहर: 

वी ऑल डाय अलोन... लिझ !!!

Submitted by Girish Kulkarni on 26 March, 2011 - 07:43

*******************************
*******************************

आसुसलेल्या मनावरचे आठवणींचे ओरखडे
कधी गुदमरवणारे...कधी गोंजारणारे
लहानपणी पिकल्या आंब्यावरची शाख
मित्रांपेक्षा स्वतःलाच मिळावी
इथपास्न सुरु झालेली हव्यासाची जत्रा
तिला पाटाच्या पाण्यात न्हातांना बघेपर्यंत
नवथरच असावी...
पुढे पाटाचही पाणी आटलं अन आंबेही संपलेच
जत्रा मात्र बहरत होती..
येणारे पावसाळे तुला-मला भिजवतच आले
तिची सावली शिशिरालाही लाजवतच राहीली
अन सोबतच्या मैत्रांच जगरहाटीशी जुळवुन घेणही...
अन माझं जेटवरनं बोईंगवर अन बोईंगवरनं हवेत जाणही...!!!
एकीकडे तिच्या मिठीतले उत्सव
तनामनातले प्रमाद शमवतच गेले...

गुलमोहर: 

सहवास

Submitted by निनाव on 26 March, 2011 - 06:16

क्षितिजा वर मावळतांना तु
मज वर प्रेम करशील का?
श्वासांमधल्या अंतरामधुनी
शोध माझा घेशील का?

समोर दिसून लांब किती तु
जवळ मज येशील का?
अंतर मिटता मिटता
मज तु उमजशील का?

प्रत्येक प्रहर अशी अनोळखी
तु ही मज विसरशील का?
न संपणार्या वाटा कधी ह्या
पलीकडे मज नेशील का?

तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू
नेसतात लाटा उठणार्या मनी
तारका लाजवतात मज बघुनी
कुशीत मज तु लपवशील का ?

तीच वाट अन तेच प्रवास
न तु इथे, न तुझे सहवास
शोधत तुला फिरते नजर
पुन्हा मज तु दिसशील ना?

गुलमोहर: 

पिक्चर परफेक्ट

Submitted by वर्षा.नायर on 25 March, 2011 - 17:37

सगळं कसं पिक्चर परफेक्ट आहे त्यांचं
छान घर, घरात फर्निचर
फ़र्निचरवर एक फोटो फ़्रेम
फ्रेममधे एक पिक्चर परफेक्ट फोटो
फोटोत नवरा-बायको-मुले ह्यांचा हसरा चेहरा
सगळ कसं अगदी परिकथेतल्या सारखे पिक्चर परफेक्ट
पण....
त्याच पिक्चर परफेक्ट घरात अजुन पण कुणीतरी रहातं
किंबहुना त्याचं आस्तित्व घरभर आहे
प्रामुख्याने आहे
पण बसं फोटॊ काढतांना त्यांनी त्याला मात्र बोलविले नाही.
तो आला तर मग फोटो पिक्चर परफेक्ट येणार नाही ना
आणि मग संसार सुद्धा पिक्चर परफेक्ट दिसणार नाही.
शेवटी त्यांना ह्या जगाच्या शोकेस मधे उभे रहायचे आहे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता