Submitted by छाया देसाई on 3 April, 2011 - 05:31
सफेद केसात म्हातारपण हसत
लहान मुलात बालपण खेळत
पण नुकतच उमललेल माझ तारुण्य?
.
.
.
ते जसच्या तस तू अजून जपत आहेस .
येवू का घ्यायला?
आयुष्यात तशी तृप्त तृप्त
आसक्ती नाही ,
ना कुणावर आरक्त
गाणी गाते ,मुलात खेळते
लेन्सेसमुळे आता बरेच दिसते
पण तुझ्या डोळ्यात मिसळलेली
ती पहिली नजर?
.
.
.
तिच्या आर्ततेसकट
येवू का घ्यायला?
खूप प्रयत्न केले
तू कधी उलगडला नाहीस
मिटला कळा फुलला नाही
काळाच्या रहाटगाडग्यावर
कधी आरूढ झाले कळलच नाही
माझ्या शिवारात पाणी वळलय
तरी...............
.
.
.
प्रवाह बदलून सांग सागरा
येवू का?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सफेद केसात म्हातारपण हसत लहान
सफेद केसात म्हातारपण हसत
लहान मुलात बालपण खेळत
पण नुकतच उमललेल माझ तारुण्य?
.
छान मस्त लिहिलेत .आवडले.!!
प्रवाह बदलून सांग सागरा येवू
प्रवाह बदलून सांग सागरा
येवू का?
छान प्रतिमा!
एकूण भाव पण रसात्मक!
मिटला कळा फुलला नाही म्हणजे काय?
मस्त!! आवडले
मस्त!! आवडले
अफलातून आहे रचना....
अफलातून आहे रचना....
वाह ! अगदी सहजसुंदर आणि उत्कट
वाह !

अगदी सहजसुंदर आणि उत्कट कविता !