काळीज हवे ना वेदनेचे

Submitted by कल्पी on 3 April, 2011 - 07:54

काळीज हवे ना वेदनेचे
चिरलेल्या कातडीचे
व्रणातुन निघालेले
रक्त पिउन घेण्याचे

किळस जखमेची करणे
पहिले लक्षण माणसाचे
बाह्यरुपात काय नसते
परिवर्तन करा हृदयाचे

त्यांच्यातही सुर्य लपलेला
पहा उघड्या नजरेने
का तोंड झाकुन चालता
सेवा करा बाबाच्या स्पर्षाने
कल्पी जोशी
03/07/2010

गुलमोहर: 

काळीज हवे ना वेदनेचे
चिरलेल्या कातडीचे
व्रणातुन निघालेले
रक्त पिउन घेण्याचे
छान .आवडली !!

सांगा बाबा, तुमच्यासाठी मी काय करू?-इन्दिरा गान्धी

प्रधानमन्त्री महोदया,
मी तुमच्यासाठी काय करू?-बाबा आमटे