झुंज वसंत

Submitted by अज्ञात on 4 April, 2011 - 00:36

मनपानानं पक्षी व्हावं; डोळे भरून आकाश प्यावं
अनअवधानानं अवधान; कुणि व्याधानं वेधुन घ्यावं

ही जखम गोडशी नववचनात भिजावी
संवाद कळ्यांशी; मूर्छा मधुतम यावी
निववीत झुंज निकराची
वार्‍यातुन झुळुक झरावी

तन कथा शोडषी अंग भरून वहावी
रजनी गंधाची तमा; तमात विरावी
तदनंतर श्वासा श्वासांची
स्पर्धाच न शेष उरावी

माळरानानं हुरळुन जावं; वन वसंतवैभव व्हावं
सारं उधाण उधळून द्यावं; पाना पानानं झुलत रहावं

.....................अज्ञात

गुलमोहर: