गडव्यथा

Submitted by सुशिल गणोरे on 4 April, 2011 - 08:45

गडव्यथा

कश्या सांगू
यातना माझ्या
सुखात होतो
कुशीत तुझ्या
का दूर झाला
तू बंधनातून
माझ्या शिवराया
टोचतात खिळे
जेव्हा आठवण
येते काळाची
तू झी या.............

काळ तुझा
उधळला
कडा माझा
कोसळला
राहायचा येथे
सैन्याचा गोळा
आता वाहतो
शुकशुकाट
खळखळा

किल्ला संबोधत
तुम्ही मला
सुख मिळे
माझ्या मनाला
आता म्हणतात
पडका गड
हादरते तार
हृदयाची थरथर

आठवण तुझी झाली
कि भरभरून
हसावं वाटत
क्षणात या
काळात आलो
कि खळखळून
रडावं लागतं

सवय झाली
या जीवनाची राज्या
झरा वाहतो
डोळ्यांतून माझ्या
आठवण होते जेव्हा
मनी तुझी या............................

कवी
सुशिल गणोरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: