कुणाला सांगणे काही नसावे

Submitted by कल्पी on 4 April, 2011 - 09:34

कुणाला सांगणे काही नसावे
कुणाशी मागणे काही नसावे
एकटेच जावे नदिकिनारी
कुणीही सोबतीला नसावे

पाऊलखुणांना कुशीत घेउनी
नभाला पाहुनी शोधावे तुला
चाहूल घ्यावी स्पर्षाची तुझ्या
विसरुन बघावे सावलीत" तुला"

खळाळत्या जलास पाहुनीया
गोड चेहरा तुझा आठवावा
मंजुळ स्वराशी मी एकरुप व्हावे
"यमन "सांजवेळी पुन्हा आळवावा

कुणाला सांगणे काही नसावे
कुणाशी बोलणे व्यर्ज व्हावे
एकट्याने एकटेच गात जावे
आठवांचे पुन्हा कर्ज घ्यावे

एकात एक ना दुजा असावा
तुझ्या सावलीचा संग असावा
बासरीच्या स्वरांना "तु" जाणवावी
माझ्यातला "मी" आतुर व्हावा
कल्पी जोशी
०५/०४/२०११

गुलमोहर: 

कुणाला सांगणे काही नसावे
कुणाशी मागणे काही नसावे

पाऊलखुणांना कुशीत घेउनी

विसरुन बघावे सावलीत" तुला"

कुणाशी बोलणे व्यर्ज व्हावे
एकट्याने एकटेच गात जावे

तुझ्या सावलीचा संग असावा

या पंक्ती आवडल्या.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!