कवितेला माझ्या मी तोडणार नाहीच

Submitted by कल्पी on 4 April, 2011 - 07:07

माझ्या प्रत्येक कवितेला
तुझाच शेरा पहिला असतो
शब्दा शब्दा ला चुकांचा मारा असतो
अन म्हणत असतोस
कविता काय असते
कळतय काय तूला
मी मनात चिडते,उगाच् रडते
अन मनाशीच बोलते
अरे तूला कळतात काय
उस्फ़ुर्त भावना................
तूला कळतात काय
प्रसाववेदना................
तूला कळत काय
भावनांचा स्वछ्चंदीपणा
काय तूला जे वाटतं ते मला का पटावे
तुझ्या शब्दांना मी आपले का म्हणावे
कवितेला माझ्या मी अनाथ का करावे
उगाच मोडीत तोडीत यमकात का बसवावे
मला नाही भावे ते कवितेचे तोडणे
शब्दाशब्दात यमकाला घुसवणे
अरे झिरपू देना भावना
पाणावू दे ना डॊळे
खरीखुरी ती माझीच असते
माझी होउन नसात भिणते
कळतय काय तूला
पुन्हा पुन्हा ऐकणार नाहीच
कवितेला माझ्या मी तोडणार नाहीच

कल्पी जोशी २५/०१/२०१०
.............................

गुलमोहर: 

“अरे झिरपू देना भावना
पाणावू दे ना डॊळे
खरीखुरी ती माझीच असते
माझी होउन नसात भिनते”

हे बरोबर .... पटण्यासारखं आहे.
---------------------------------------------------------
परंतु, छंदात लिहिताना कवितेची तोडमोड करावीच लागते हे मात्र पटण्यासारखं नाही. काव्याचा बाज आणि आशयाची बूज राखून, छंदबद्ध कवितेत देखील तितक्याच उत्कटतेने भाव अभिव्यक्त करता येतात. अर्थात् त्यासाठी छंदबद्ध कवितेची आवड, छंदाचे ज्ञान आणि शब्दसंपदा तसंच शब्दांवर हुकमत असणं गरजेचं असतं. असं माझं वैयक्तिक मत आहे.
(मी दोन्ही प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.)
कुठल्याही प्रकारातली कविता प्रकाशित करण्याआधी तिच्यावर आवश्यक ते संस्करण करावच लागतं.

परंतु, छंदात लिहिताना कवितेची तोडमोड करावीच लागते हे मात्र पटण्यासारखं नाही. काव्याचा बाज आणि आशयाची बूज राखून, छंदबद्ध कवितेत देखील तितक्याच उत्कटतेने भाव अभिव्यक्त करता येतात. अर्थात् त्यासाठी छंदबद्ध कवितेची आवड, छंदाचे ज्ञान आणि शब्दसंपदा तसंच शब्दांवर हुकमत असणं गरजेचं असतं. असं माझं वैयक्तिक मत आहे.>>> अतिशय सहमत!

मी मनात चिडते,उगाच् रडते
अन मनाशीच बोलते
अरे तूला कळतात काय
उस्फ़ुर्त भावना................
तूला कळतात काय
प्रसाववेदना.........>>> उत्तम विचार! (प्र'स'ववेदना??)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!