पत्रक

अधिवेशनामागचे चेहरे : श्री. बाळ महाले

Submitted by अजय on 9 July, 2012 - 09:00

बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाचे मुख्य निमंत्रक श्री बाळ महाले यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.

1) अधिवेशनामधे तुमचं कार्यक्षेत्र कुठलं आणि संयोजनात तुमची कुठली भूमिका आहे?
अधिवेशनात मुख्य निमंत्रक म्हणून माझी प्रमुख भूमिका म्हणजे अधिवेशनासाठी लागणाऱ्या संघटनेची उभारणी, वेगवेगळ्या समित्यांमधील समन्वय आणि जनसंपर्क. मला सांगायला खूप आनंद होतोय की आमची दोनशेहून अधिक उत्साही स्वयंसेवकांची संघटना तयार झाली आहे आणि ही संघटना दर महिन्याला वाढतेय.

जुन्नर - भिमाशंकर व्हाया ओझर

Submitted by जिप्सी on 30 June, 2012 - 11:41

१६-१७ जुन जुन्नर परीसरात केलेल्या भटकंतीची हि छायाचित्रे. मुंबईहुन जाताना पाऊस लपाछपी खेळत होतो मात्र भिमाशंकरला त्याने आम्हाला गाठलेच आणि परतीच्या प्रवासात माळशेज घाटात सीझनचा पहिला धबधबा दाखवला. Happy

प्रचि ०१
भैरवगड

प्रचि ०२
कोरडा ठणठणीत माळशेज घाट Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संवाद : श्री. विक्रम गोखले

Submitted by चिनूक्स on 27 June, 2012 - 15:05

विक्रम गोखल्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं, त्याला आता सदतीस वर्षं झाली. त्यांच्या भूमिकांमधून, दिग्दर्शनातून ते सतत आपल्यासमोर असतात. विविध विषयांवर आपली मतं ते मांडतात. सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक मितींचा परामर्श एका छोटेखानी मुलाखतीत घेणं केवळ अशक्य आहे.

'हा भारत माझा'च्या आणि अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्तानं पन्नाशीतल्या महाराष्ट्राच्या, आपल्या देशाच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक आरोग्याबद्दल, मूल्यांच्या र्‍हासपर्वाबद्दल, कलावंताच्या सामाजिक व राजकीय बांधिलकीबद्दल विक्रम गोखले यांना काय वाटतं, हे या मुलाखतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

शब्दखुणा: 

मायबोली वर्षा विहार २०१२ नोंदणी.

Submitted by ववि_संयोजक on 24 June, 2012 - 21:57

nondani.jpgवर्षा विहार ... वर्षा विहार ... मायबोलीचा वर्षा विहार ...तोही दहावा ....

तर मंडळी, समस्त मायबोली परिवाराकरता मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१२...

प्रांत/गाव: 

मे २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by Admin-team on 13 June, 2012 - 00:26

मे २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

p-18037.jpg रेषाटन आठवणींचा प्रवास - शि.द.फडणीस

p-18036.jpg आमच्या आयुष्यातील काही आठवणी : लेखिका - रमाबाई रानडे

शब्दखुणा: 

'रेषाटन - आठवणींचा प्रवास' - श्री. शि. द. फडणीस

Submitted by चिनूक्स on 11 June, 2012 - 01:00

ज्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ज्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली, ते व्यंग्यचित्रकार म्हणजे शिवराम दत्तात्रेय फडणीस. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीनं शिदंनी गेली पाच दशकं वाचकांना हसवलं आहे. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.

उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी अभूतपूर्व सुवर्णसंधी: BMM सारेगम 2013 स्पर्धा

Submitted by अजय on 4 June, 2012 - 22:51

येत्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी "BMM सारेगम 2013" स्पर्धा आयोजीत केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍या Richmond, Raleigh, Tampa, Dallas, SFO, LA, Seattle, Toronto, St. Louis, Detroit, NJ या शहरात होणार असून अंतिम फेरी प्रॉविडन्स , र्‍होड आयलंड इथे जुलै २०१३ मधे होणार आहे.

विषय: 

नवीन उपक्रमः महिन्याची जाहिरात

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा मायबोलीकरांनाही व्हावा यासाठी मायबोली नेहमीच प्रयत्नशील असते. मायबोली, मायबोलीचे उपक्रम आणि मायबोलीकर ही एक परस्परावलंबी पर्यावरण व्यवस्था (Ecosystem)आहे
या महिन्यापासून मायबोलीच्या जाहिरात विभागात नवीन उपक्रम सुरु करतो आहोतः महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.

जून २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
मुंबईत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

विषय: 
प्रकार: 

मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?

Submitted by रुणुझुणू on 30 May, 2012 - 15:12

कसलीच तयारी न करता पहिल्यांदाच गिर्यारोहणाला जाणारे किती लोक पाहिले आहेत तुम्ही ??

ज्या जागी जायचं आहे तिथला नकाशा, तिथे आधी कुणी गेलंय का, त्यांचे अनुभव काय होते, तिथलं वातावरण कसं असेल, सोबत काय न्यावं लागेल, तिथे त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्यात काय बदल करावे लागतील, आणि सगळी काळजी घेऊनही काही त्रास झालाच तर काय उपाययोजना करायची.....
......बहुतांशी लोक अशी शक्य तितकी माहिती गोळा करूनच गिर्यारोहणाला निघतात.
आणि असं केल्यामुळे " आपल्याला नक्की जमेल हे ! " हा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो, प्रवास तुलनेने सुखकर होतो.

उद्योजक आपल्या भेटीला - फडणीस ग्रूप

Submitted by Admin-team on 29 May, 2012 - 08:48

अश्वमेध यज्ञ पूर्ण होण्यासाठी दोनच साधने पुरेशी असतात. एक, अश्वमेध यज्ञ करण्याची आकांक्षा आणि दुसरे साधन म्हणजे विजेता ठरूनही पराजितांना आपले मानण्याची व त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मनोवृत्ती.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक