उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी अभूतपूर्व सुवर्णसंधी: BMM सारेगम 2013 स्पर्धा

Submitted by अजय on 4 June, 2012 - 22:51

येत्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच उत्तर अमेरिकेतल्या गायकांसाठी "BMM सारेगम 2013" स्पर्धा आयोजीत केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेर्‍या Richmond, Raleigh, Tampa, Dallas, SFO, LA, Seattle, Toronto, St. Louis, Detroit, NJ या शहरात होणार असून अंतिम फेरी प्रॉविडन्स , र्‍होड आयलंड इथे जुलै २०१३ मधे होणार आहे.
saregama.png

स्पर्धेचे नियम , स्पर्धेच्या अधिकृत वेबसाईटवर (saregama.bmm2013.org/) पाहता येतील.

या बाबत ताज्या बातम्या मिळवण्यासाठी अधिवेशनाच्या फेसबुक पानाला Like करून चाहते व्हा.
https://www.facebook.com/bmm2013

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो, एक खुशखबर !!!

"BMM सारेगम 2013" या स्पर्धेच्या semifinal राऊंडसाठी आपली मायबोलीकर "जयंती" हिची निवड झाली आहे.
ही, semifinal राऊंड, बॉस्टन येथे दिनांक १३ एप्रिल, २०१३ रोजी पार पडणार आहे. तरी बॉस्टन व आजूबाजूच्या मायबोलीकरांनो, जयंतीला चीअरअप करण्यासाठी तेथे जरूर उपस्थित रहा.

जयंती, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना मनापासून धन्यवाद.
<<(थोडक्यात तुमचं गाणं चुकलंय फिनिक्सला)>> मग आता तुम्हाला परत यावंच लागेल फिनिक्सला.

बी.एम एम. सारेगम २०१३ या स्पर्धेच्या एल ए येथे झालेल्या प्राथमिक फेरीला उपस्थित राहण्याचा योग आला. अनुभव अत्यंत सुखद होता. स्पर्धेचं आयोजन अत्यंत सुविहित होतं.
सूत्रसंचालन कमी पण परिणामकारक शब्दांत केलं गेलं. श्रोत्यांना अतिशय कळकळीची विनंती केली गेली त्यामुळे स्पर्धा सुरु असताना, आपसांत गप्पा मारणे, स्पर्धेच्या हॉलमधून ये-जा करणे, लहान मुलांनी स्टेज पुढे खेळणे वगैरे अजिबात झाले नाही. आणि स्पर्धकांचं लक्ष विचलीत न होता स्पर्धेचं गांभीर्य टिकून राहिलं. याबद्दल आयोजकांचं आणि तिथल्या श्रोत्यांचं खास कौतुक!
स्पर्धकही मनापासून तयारी करून आले होते. चांगले गात होते त्यामुळे ही स्पर्धा न वाटता चक्क
मराठी गीतांचा कार्यक्रमच वाटला. बरेच स्पर्धक अप्रतिम गायले की जजेसना निकाल देणे नक्कीच कठीण गेले. अश्यावेळी खूप कठीण गाण्याची निवड केलेल्या, आणि मूळ गाण्याच्या जवळपास गाऊ शकलेल्या स्पर्धकांच्या बाजूने निकाल लावल्याचे त्यांनी नमूद केले.
एकंदरीत स्पर्धेचा दर्जा पुण्या-मुंबईत नामांकित संस्थांमधून होणा-या स्पर्धांच्या तोडीसतोड होता हा सुखद धक्का इथे शेअर करावासा वाटला! Happy

जयंती, हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

अनिताताई: छान लिहीलंत Happy जयंतीची पुढची तयारी तुमच्या देखरेखीखाली होते आहे का? तर मग तिला अंतिम फेरीतही स्थान नक्की मिळेल. ती विजेतीही होऊ शकते Happy

पौर्णिमा, जयंतीची पुढची तयारी तुमच्या देखरेखीखाली होते आहे का?>>>>>>>
''देखरेखीखाली'' सुरु आहे! सध्या मी चुका काढणे या मोड मधे आहे! Happy गाणी तिची तिच ऐकून तयार करत आहे. आत्तापर्यंत दिलेली शिदोरी तिच्याबरोबर आहे आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाही!
''कठीण गाणं घे स्पर्धेसाठी'' हा सल्ला उपयोगी ठरला!

Pages