पत्रक

नवीन किल्ल्याचा शोध!! - मायबोलीकर "हेम" यांचे अभिनंदन!!!!!

Submitted by जिप्सी on 27 May, 2012 - 03:33

प्रसिद्ध गिर्यारोहक राजन महाजन (ठाणे) आणि हेमंत पोखरणकर (नाशिक) यांनी आजवर अज्ञात असलेला लोंझा हा औरंगाबादजवळील किल्ला प्रकाशात आणला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

संयुक्ता मुलाखत - लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर

Submitted by नानबा on 23 May, 2012 - 00:09

"अस्तमान दोन घटकेचा मर्द राहिला
सख्याची स्वारी घराकडे आली
उंच माडीवर चवथ्या मजल्यावर
तळजागा करविली
झुळुक वार्‍याची हवा सुटली
तशीच पतंगाची मजा वाटली"

ह्या लावणीच्या ओळींवर बसून, सुरमांडी घालून, कधी उभं राहून, कधी कुशीवर आडवं होऊन एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा वेगवेगळ्या प्रकारे पतंग उडवून रसिकांची मनं जिंकणार्‍या - लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांची मुलाखत घेण्याचा योग नुकताच आला.

तुम्हाला आवडलेलं लेखन, मायबोलीबाहेरच्या मित्रमंडळींना सांगायची सोय.

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीवरचं आवडलेलं लेखन, मायबोलीकर वेगवेगळ्या पद्धतीने मित्रमंडळीना कळवत असतातच. आता ते थोडं सोपं झालंय. प्रत्येक लेखनाखाली आता फेसबुक आणि गुगलवर टिचकीसरशी आवडलेलं लेखन कळवायची आणि अगोदर किती लोकांना ते आवडलंय ते पहायची सुविधा उपलब्ध आहे.

या सुविधेसाठी मायबोलीवर प्रवेश करायची (लॉगीन) गरज नाही. त्यामुळे जे मायबोलीकर नाहीत किंवा वाचनमात्र आहेत त्यांनाही लेखन आवडले तर कळवता येईल. फेसबुकावर किंवा गुगल मधे मात्र प्रवेश करावा लागेल.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आईला शाळेत जायचंय : अमेरिका (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 20 May, 2012 - 11:13

अमेरिकेला आल्यावर व्हिसा, घरच्या जबाबदार्‍या अशा कारणांनी अनेक स्त्रियांना नोकरी करणे शक्य होत नाही. बर्‍याच स्त्रिया स्वतःहून मुलांसाठी आपली नोकरी बाजूला ठेवतात. एकदा मुलं शाळेला जायला लागली की मग पुन्हा नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु मोठ्या कालावधी नंतर सुरुवात करणे फार कठिण जाते. डिग्री जुनी झालेली असते. स्किल सेट सध्याच्या जॉब मार्केटपेक्षा मागे पडलेला असतो. अशावेळी बरेचदा नवीन क्षेत्रात शिक्षण घेणे किंवा आपल्या डिग्रीला पूरक शिक्षण घेणे हे दोन पर्याय शिल्लक राहतात. योग्य माहिती असल्यास / मि़ळवल्यास आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास अमेरीकेत शिक्षण घेणे सोपे आहे.

’हा भारत माझा’ - २३ फेब्रुवारी खेळ - हाऊसफुल!!

Submitted by admin on 11 February, 2012 - 01:42

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शीत करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहाण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली आता फेसबुकावर

Submitted by admin on 9 February, 2012 - 12:18

आपली मायबोली आता फेसबुकावरही आलेली आहे. http://www.facebook.com/maayboli या दुव्यावर जाऊन तुम्हीही आता मायबोलीचे चाहते होऊ शकता.

शब्दखुणा: 

मराठी भाषा दिवस २०१२- लहान मुलांचे कार्यक्रम

Submitted by संयोजक on 7 February, 2012 - 13:54

आपलं बालपण समृद्ध करणारा आपल्या भाषेचा पिढीजात वारसा, आपल्या मातीशी तिथल्या निसर्गाशी, माणसांशी आपलं नातं जोडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी. नव्या पुस्तकांचा हट्ट धरायला लावणार्‍या, त्यांच्या सुवासासारख्या दरवळत राहणार्‍या, आयुष्यभर साथ करणार्‍या रंजक गोष्टी. आजीआजोबांच्या मायेची ऊब देणार्‍या गोड गोष्टी. मुलांचं आकलन वाढतं तशा स्वरचित गोष्टींनाही बहर येतो. त्या तर भन्नाट !

१. नेहमीच्या गंमतगोष्टी
नियमावली

विषय: 

मायबोली - शीर्षकगीत : प्रकाशन

Submitted by Admin-team on 30 January, 2012 - 20:49
मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.
-मायबोली.कॉम


मायबोली शीर्षकगीत ऐका:

विषय: 
शब्दखुणा: 

'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' परिसंवाद विशेषांक - घोषणा १

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2012 - 00:42

नमस्कार मंडळी,

स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक