पत्रक

'संहिता', 'पुणे ५२' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात

Submitted by माध्यम_प्रायोजक on 4 October, 2012 - 02:37

मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हींग इमेजतर्फे आयोजित केलेल्या १४व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या 'पुणे ५२', 'संहिता' आणि 'इन्व्हेस्टमेण्ट' या तीन चित्रपटांची निवड झाली आहे. हे तिन्ही चित्रपट 'इंडिया गोल्ड' या स्पर्धाविभागात दाखवले जातील.

हितगुज दिवाळी अंक २०१२ - संकल्पना

Submitted by संपादक on 28 September, 2012 - 02:27

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : रविवार, २८ ऑक्टोबर २०१२ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत]

साहित्य पाठवण्यासंबंधी आधिक माहितीसाठी पहा - http://www.maayboli.com/node/38219


rangoli7b.jpg

नमस्कार सुजनहो !

चराचराला उजळून टाकणार्‍या दिव्यांच्या उत्सवासोबतच दरवर्षी येतो शब्दब्रह्माचाही उत्सव.. मायबोली हितगुज दिवाळी अंकाच्या रूपात!!

ऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

Submitted by Admin-team on 11 September, 2012 - 22:08

ऑगस्ट २०१२ - खरेदीतील काही नवीन पुस्तके

p-18085.jpgजॉन बेकर - अनुवाद: जोसेफ तुस्कानो सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही...वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या.
या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे.

शब्दखुणा: 

ऑगस्ट महिन्याची जाहिरातः उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही महिन्यापासून या विभागात नवीन उपक्रम सुरु केला आहे: महिन्याची जाहिरात.
मायबोलीवर आणि मायबोलीबाहेर (उदा मायबोलीचे फेसबुक पान) या जाहिरातीला विशेष प्राधान्य देऊन दाखवण्यात येईल.
सप्टेंबर २०१२ ची महिन्याची जाहिरात आहे
उभ्या उभ्या विनोद फिनिक्समधे गणपती उत्सव २०१२
जाहिरातदार आहेत विनय देसाई (मायबोली आयडी परदेसाई ). विनय देसाई गेली १० वर्षे मायबोलीकर आहेत.

याशिवाय काही जाहिराती:
१. मैत्रिणीच्या मुलासाठी वधु पाहिजे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'चॅम्पियन्स'च्या निमित्ताने ऐश्वर्या व अविनाश नारकरांशी गप्पा

Submitted by अवल on 29 August, 2012 - 01:37

समाजाला बोलकं करण्याचं महत्त्वाचं काम चित्रपटांनी केलं. त्यामुळे चित्रपट हे केवळ करमणुकीचं साधन न ठरता त्यांतून नेहमीच सामाजाचं प्रतिबिंब दिसत आलं आहे. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे गेली वीस वर्षं चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात वावरत आहेत. सशक्त अभिनेते म्हणून दोघांनीही नाव कमावलं आहे. मनोरंजनाबरोबरच समाजिक भान देणारे सकस चित्रपट निर्माण करावेत, या हेतूनं नारकर दांपत्यानं स्वतःची निर्मितीसंस्था स्थापन करून 'चॅम्पियन्स्' हा चित्रपट तयार केला.

विषय: 
शब्दखुणा: 

पानगळ

Submitted by दाद on 28 August, 2012 - 21:08

"आई गंss... आईss..."
बाबाच्या खोलीतून आवाज आला तशी निमा हातातलं ठेऊन चटकन उठली. तिनं आरशात बघून कुंकू ठीक केलं आणि खोलीच्या दारात येऊन उभी राहिली.

कमरेला एका हाताचा आधार देत बाबा पाय उंच करून शेल्फच्या वरच्या फळीवरलं पुस्तक काढण्याच्या प्रयत्नात होता. तिची चाहूल लागताच वळला. तिला भेटण्याच्या अगदी क्षण आधी बाबाची नजर रिकामी झालेली तिला जाणवली.
आणि निमाला वाटलं, देवा... आपल्या पायातलं बळ जाणार आता... बाबा आपल्याला ह्या वेषातही विसरतोय...
तोच, चष्म्याच्या आडून डोळे मिचकावत बघण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीने तिच्याकडे बघतानाच बाबाच्या नजरेत ओळख आली.

शब्दखुणा: 

दवंडी पहिली - मायबोली गणेशव्रत वसा - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 27 August, 2012 - 16:12

2012_Davandi_1_final.jpgमायबोलीकरांनो, आजच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या सुमुहूर्तावर पहिली दवंडी सादर करत आहोत.

उद्योजक आपल्या भेटीला- प्राजक्ता कुलकर्णी

Submitted by साजिरा on 27 August, 2012 - 02:45

माणूस जितका जुना असेल तितकीच जुनी बहुतेक घर सजवण्याची कला..! राहायला घर हवं, याचं भान आलं तसंच पुढे ते छान हवं, सुंदर हवं वगैरे याचंही हळुहळू आलं असेल. लाखो वर्षे गेली, नि उत्क्रांतीसोबतच या गृहसजावटीच्या कलेतही क्रांतीकारक बदल झाले. आजही घर आणि सजावट हा विषय सामान्याच्या जवळचा, जिव्हाळ्याचा. घर सजवून देणार्‍या लोकांशी जिव्हाळ्याचं नातं तयार होईल असा. ही कला सहजसाध्य, सोपी असेल असं कधी वाटतं, तर कधी तिच्या वेगवेगळ्या अविष्कारांमधून, साक्षात्कारांमधून थक्क व्हायला होतं. कल्पनाशक्तीला आणि बुद्धीला आव्हान देणारी ही कला नवनवीन तंत्राला, तंत्रज्ञानाला आणि बदलांना सहज सामोरं जाते.

विषय: 

अतुल्य! भारत - भाग १९: बदामी कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 26 August, 2012 - 03:35

जुलै २०११ चा महिना होता. बायको नुकत्याच झालेल्या पिलाला घेऊन विश्रांतीसाठी माहेरी गेली होती आणि मी बंगलोरात एकटाच होतो.
बायको गेली माहेरी,
काम करी पितांबरी...
ह्या जिंगल प्रमाणे पितांबरी कुठे मिळेल ह्याचा शोध सुरु झाला. शोधता-शोधता बदामी चे नाव पुढे आले. २-३ मित्रांना विचारले तर तेही लगेच तयार झाले आणि तिकिटे बुक केली.
बदामी छोटेसे गाव आहे. बदामीला स्वतःचे असे छोटे स्टेशन आहे. जवळचे मोठे गाव बागलकोट. बंगलोर ते बदामी असा ओव्हरनाईट प्रवास आहे.
बदामी ही चालुक्य राजवटीची राजधानी होती.

शब्दखुणा: 

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास

Submitted by agaiki on 22 August, 2012 - 15:20

नमस्कार-
काल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य!
धन्यवाद,
आकाश
हा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पत्रक