मायबोली गणेशोत्सव २०१२

'उद्द्यापन' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 9 October, 2012 - 20:52

संयोजनासाठी नाव द्यावं की नाही अशा चलबिचल अवस्थेतून झालेली सुरुवात आज "अरे! संपलं सुद्धा, आता परत इ-भेट कधी?" अशा हुरहुर लावणार्‍या अवस्थेत संपली. संयोजनासाठी नाव देताना, हां ठिके! नाव देऊ - झाली निवड तर नेमून दिलेले काम करून कार्य पार पाडू, हा का ना का! एवढं सोपं वाटलं होतं. सुरुवात झाली तीच मुळी फेल गेलेली व्हिडिओ कॉन्फरन्स - मुख्य संयोजकांनी दुसर्‍या मिटींग नंतर घेतलेली सपशेल माघार - दोन तीन संयोजकांचा नो शो - नव्या संयोजकांची शोधाशोध - त्यांच्याबरोबर पुन्हा करावी लागलेली अथश्री - अशी, बेरीज थोडी आणि वजाबाकी जास्त...

गणेशोत्सव २०१२ : स्पर्धांचा निकाल!

Submitted by संयोजक on 6 October, 2012 - 03:27

नमस्कार मंडळी,
गणेशोत्सवातील सर्व स्पर्धांमध्ये आपण बहुसंख्येनी सहभागी झालात, तसेच भरभरून दादही दिलीत, त्याबद्दल संयोजक मंडळातर्फे आपणासर्वांचे मन:पूर्वक आभार.

यावर्षी आम्ही ४ स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
१. तों.पा.सु. - हस्तकला स्पर्धा
२. गर्जा महाराष्ट्र माझा - गटलेखन स्पर्धा
३. मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम् ! - पाककृती स्पर्धा - गोड विभाग व तिखट विभाग
४. चित्र बोलते गुज मनीचे - काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा

'श्रेयनामावली' - मायबोली गणेशोत्सव २०१२

Submitted by संयोजक on 5 October, 2012 - 10:27

नमस्कार मंडळी,

गेले काही दिवस वाजत गाजत असलेल्या २०१२ मायबोली गणेशोत्सवाची आता सांगता झाली. आपण सगळ्यांनी बाप्पांना " गणपती बाप्पा मोरया | पुढच्या वर्षी लवकर या ||" असं सांगून ती सुफळ संपूर्ण करविली.

अगदी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेपासूनच मायबोलीकरांच्या मदतीचा ओघ सुरु झाला. उच्चासनारूढ अशा गणेशमूर्तीचे प्रकाशचित्र जिप्सी यांनी अगदी विनाविलंब दिले. (मंडप, आजूबाजूची आरास वगैरे कलाकुसर संयोजकांची बर्का!) चैतन्य दिक्षीत यांनी बासरीवादनाचे पार्श्वसंगीत देऊन प्रतिष्ठापनेच्या मंडपाचे पावित्र्य द्विगुणित केले. हार्दिक आभार जिप्सी आणि चैतन्य!

कल्पकता संयोजकांची-२ (दैनंदिन कार्यक्रम,स्पर्धा,उपक्रम)- मायबोली गणेशोत्सव२०१२

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 16:20

गणेशोत्सव २०१२ मधील दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांच्या कल्पक जाहीराती इथे एकत्रीत स्वरूपात देत आहोत.
श्री गणेश प्रतिष्ठापना:-
aaraas.jpg
प्रकाशचित्रः- जिप्सी संकल्पना आणि मांडणी:_मधुरा_

स्पर्धा आणि उपक्रम :

2012_tompasu_edited.jpgvia

बालचित्रवाणी - रुद्राक्ष - MallinathK

Submitted by संयोजक on 30 September, 2012 - 13:57

गर्जा महाराष्ट्र माझा! - रंग सोन्नलगीचे - लैभारी.

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 September, 2012 - 16:25

---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
कंपुचे नाव :- लैभारी.
लेखाचे नाव :- रंग सोन्नलगीचे.

सहभागी मायबोलीकर
विशाल कुलकर्णी
मल्लिनाथ करकंटी
मुग्धा कुलकर्णी
स्वप्ना लाड
कांचन कुलकर्णी

---------------------------------------------------------------------------------------------------------

मिसळम् पाकम् गट्टम् गट्टम्! - 'स्विटी-पाय' - गोड - लाजो

Submitted by लाजो on 29 September, 2012 - 10:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
पाककृती प्रकार: 

तों.पा.सु. - वरणभात झिंदाबाद ! - रुणुझुणू

Submitted by रुणुझुणू on 29 September, 2012 - 09:40

तोंपासु हस्तकला स्पर्धेतील पेढे, बर्फी, मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे केक्स, ढोकळा, सुरळीच्या वड्या, काला-जामुन, कॉफी, वडापाव, ब्राऊन राइस नूडल्स आणि इतरही वेगवेगळे पदार्थ खाऊन तृप्त झालेले बाप्पा हळूच म्हणाले,
" काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय..."

बाप्पांना नेमकी कुठल्या पदार्थाची आठवण येत असावी हे आमच्या लग्गेच लक्षात आलं.
आम्ही तत्परतेने ते पदार्थ बनवून केळीच्या पानात मांडले.
बाप्पांच्या चेहर्‍यावर सोंडभरून हसू पसरलेलं पाहून आम्ही खुष !

आमचा मेनू :
ऊन-ऊन वरण-भात, वरून साजूक तुपाची धार, लिंबाची फोड, खोबर्‍याची लाल चटणी, पापड आणि बटाट्याची मोकळी भाजी.

विषय: 

सुंदर माझा बाप्पा! - साक्षी - वेद

Submitted by साक्षी on 29 September, 2012 - 06:23

Ganapati-Rangoli pasting.jpg

काही रांगोळीचे रंग आहेत आणि काही coloured sand आहे.
पाल्याचे नाव : वेद नाटेकर
वय : ४ वर्षे ९ महिने
माझे योगदान : गम लावून दिला. पाताका तयार करून दिल्या.

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१२