तत्त्वज्ञान

नाम विठोबाचें

Submitted by नवनाथ राऊळ on 28 June, 2015 - 11:53

नारायणनामें । वर्षाव सुखाचा ।
उद्धार जिवाचा । तेणें होय ॥१॥

नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं ।
परमार्थहाटीं । साहुंकार ॥२॥

पांडुरंगनाम । आयुध अजोड ।
समूळ बीमोड । पातकांचा ॥३॥

इहलोकीं हेचि । साधन साचार ।
भवसिंधू पार । करावयां ॥४॥

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥

तडका - कधी-कधी,...!

Submitted by vishal maske on 27 June, 2015 - 21:42

कधी-कधी,...!

विचारपुर्वक बोलायच्या गोष्टी
विचारपुर्वक ना बोलल्या जातात
मात्र बोलुन झालेल्या गोष्टींवर
सुटकेच्या उचक्या ढाळल्या जातात

आपल्या बोलण्याच्या परिणामांचा
आपल्यावरतीच तर भार असतो
मात्र कधी आपल्या वक्तव्यावरून
आपलाच पलटवार असतो,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सत्य

Submitted by vishal maske on 27 June, 2015 - 10:44

सत्य,...

भांडायचं म्हणून उगीचंच
आम्ही भांडत बसत नाही
पण उघडं पडलेलं सत्यही
इथे कुणाला दिसत नाही

सत्यापुढे असत्याचे सामर्थ्य
कधीच टिकुन रहात नसतात
तरीही सत्यांध माणसं सदैव
सत्य झाकू पहात असतात,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विकास

Submitted by vishal maske on 25 June, 2015 - 22:31

विकास

विकास करणारांकडूनच
कधी विकासालाच ठेंगा आहे
ज्याच्या-त्याच्या डोक्यामध्ये
भ्रष्टाचाराचा भुंगा आहे

दारिद्रयाचा फापट-पसारा
जसाच्या तसा रखडला जातोय
भ्रष्टाचाराच्या या शिलेदारांकडून
इथे विकास पोखरला जातोय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हि रीत आहे

Submitted by vishal maske on 25 June, 2015 - 11:21

हि रीत आहे

कुणाकडून आरोप केले जातात
कुणाकडून मात्र फेटाळले जातात
कुणाकडून तिरस्कार केले जातात
तर कुणी मात्र हळहळले जातात

कुणा मनी द्वेश असतात तर
कुणा मनी आपुलकी असते
घडल्या प्रत्येक प्रकरणाला
वेग-वेगळी डूलकी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

विडंबन : मै और मेरी तनहाई

Submitted by आशूडी on 25 June, 2015 - 05:40

(मूळ लेखकाची क्षमा मागून)
*
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं
तुम होती तो कैसा होता
(उशीरा आल्याबद्दल टोकलं तर)
तुम ये कहती, तुम वो कहती
(भांड्यांचा ढिगारा बघून)
तुम इस बात पे हैरान होती
(कुठेत जास्त मी म्हणताच)
तुम इस बात पे कितनी हसती..
तुम होती तो ऐसा होता..तुम होती तो वैसा होता
मै और मेरे सपनोंकी बाई
अक्सर ये बाते करते हैं

(ये रात है या तेरी जुल्फे खुली हुई है)
ही धुतलेली भांडी आहेत की खरकटी राहिलेली
(है चांदनी
या तुम्हारी नजरों से मेरी राते धुली हुई हैं)
ही फरशी
जशी महिन्यापूर्वी पुसलेली दिसते आहे
(ये चांद है या तुम्हारा कंगन)

विषय: 

लाभो संतसंग

Submitted by नवनाथ राऊळ on 24 June, 2015 - 03:06

लाभो संतसंग । भक्तीचा पैं ठेवा ।
घडो हरीसेवा । जन्मोजन्मीं ॥१॥

ज्ञानियांचा राजा । भक्तराज नामा ।
मार्ग विष्णूधामां । उजळितीं ॥२॥

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥

तुका एका चोखा । वैष्णव मंडळी ।
तयां पायधुळीं । नाथ शुद्र ॥४॥

सत्संग महिमा

Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2015 - 23:41

सत्संग महिमा

चित्ता व्यापुनिया | नाना दोष तण |
होत ना प्रसन्न | कदाकाळी ||

तीर्थ सत्कर्माचे | शुद्ध करीतसे |
चित्त अनायासे | साधु संगे ||

संतसंगतीने | दोष निवारता |
अपार शांतता | लाभतसे ||

सहज उच्चार | विठ्ठल नामाचा |
गाभारी मनाच्या | घुमतसे ||

चित्त होते लय | पूर्ण चैतन्यात |
सुख बरसत | अमृताचे ||

अमृताचे पुत्र | तुम्ही आम्ही सारे |
गर्जती अपारे | साधुसंत ||

घ्यावे आकळोनि | परमार्थ सार |
नमवोनि शिर | संतांपायी ||

हरि ॐ तत् सत् ||

तडका - सत्य-असत्य,...

Submitted by vishal maske on 22 June, 2015 - 22:33

सत्य-असत्य,...

सत्यावरती पडदा घालुन
असत्य बाहेर काढले जाते
न्यायासाठीचे सत्य मात्र
सर्रास इथे पीडले जाते

मना-मनात दडेल अशी
असत्याची खोड असते
मात्र सत्याच्या पावर पुढे
असत्याची भांडाफोड असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - विषारी दारू,...!

Submitted by vishal maske on 21 June, 2015 - 22:19

विषारी दारू,...!

त्यांच्या मृत्युच्या कारणांची
दारूत नोंद कुठे करतात,...?
जे माणसं दारू पिल्याने
रोज-रोज इथे मरतात,...!

जिथे परिणाम तात्काळ
तिथेच फक्त दोष आहे
मात्र दारूमध्ये विष नाही
दारू हेच विष आहे,...!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान