तत्त्वज्ञान

पूर्णकाम !

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2014 - 22:33

पूर्णकाम !

नामाचा गजर | विठ्ठल विठ्ठल |
सुखचि केवळ | तुकयासी ||

हाकारी सदैव | विठू धाव आता |
पातला तो स्वतः | देहूग्रामी ||

का रे आरंभिला | नामाचा गजर |
रात्रंदिन थोर | सांगे मज ||

काय उणे तुज | काय देऊ बोल |
देव उताविळ | पुसतसे ||

तुका हासतसे | विठ्ठलाच्या बोला |
म्हणे जीव धाला | तुझ्या नामे ||

आता काही नसे | संसारी मागणे |
एक तेही उणे | असेचिना ||

अवघा भरला | तूच जळी स्थळी |
उणीव वेगळी | काय सांगो ||

तुकयाच्या मुखे | अमृताची बोली |
स्वये ती चाखली | विठ्ठलाने ||

जागोजागी जन | मागताती काही |
विरळाचि पाही | तुकोबा तू ||

न मागे काहीच | ऐसा पूर्णकाम |

तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||

Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2014 - 07:11

तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे |
नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||

कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥
नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥

देवांचे जुने फोटो, धार्मिक पुस्तकांचे काय करायचे?

Submitted by टोच्या on 21 October, 2014 - 11:01

प्रत्येकाच्याच घरात देवांचे फोटो असतात. दरवर्षी त्यात एक-दोन फोटोंची भर पडतच असते. घरात देवा-धर्माची अनेक पुस्तकेही असतात. मग त्यात अगदी महालक्ष्मीच्या पुस्तकांपासून ते गीता, महाभारत, रामायणासारख्या महान ग्रंथांपर्यंत. वर्षानुवर्षे घरात असलेले फोटो कुजतात, फुटतात किंवा अस्पष्ट होतात. धार्मिक पुस्तके आपण कचराकुंडीत फेकून देऊ शकत नाही. धार्मिक साहित्य नदीत सोडावे अशी एक धारणा आहे. मात्र, नदीत सोडले तर त्यावर गाळ साचून, लोकांचे पाय लागून त्याची अधिकच विटंबना होऊ शकते. अशी पुस्तके, फोटो जाळूनही टाकता येत नाही. मग अशा साहित्याचे करायचे काय, याबाबत आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

Submitted by निमिष_सोनार on 12 October, 2014 - 01:28

निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको.

निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण":
नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात.

शेक्सपीअर !

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 October, 2014 - 17:20

"रुनम्या तुझ्या नावाचा अर्थ काय रे?" ...... प्लीज, आणि नावात काय आहे बोलू नकोस.

"तुला कसे समजले, मी हेच बोलणार होतो ते?" , अचंबित होत मी उद्गारलो.

"तुझी विनोदबुद्धी तेवढीच आहे रे .." मुस्काटात मारल्यासारखा तो उत्तरला आणि शेजारच्या दोन पोरी फिदीफिदी हसू लागल्या.

आता त्या मित्राच्या मताशी सहमती दर्शवायला हसल्या, की हसल्यावर आपण सुंदर दिसतो या गैरसमजातून हसल्या, कळायला मार्ग नाही. पण माझ्यावर काही विनोद घडला की गरजेपेक्षा जास्त हसण्याची फॅशनच आलीय सध्या आमच्या ऑफिसमध्ये.

शब्दखुणा: 

मन से रावण जो निकालू राम मेरे मन में है

Submitted by सुमुक्ता on 6 October, 2014 - 09:45

अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि पापावर पुण्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे दसरा. ह्याच दिवशी रामाने रावणाचा वध केला, ह्याच दिवशी दुर्गामातेने महिषासुराचा वध केला, ह्याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून शमीच्या वृक्षावरून आपली शस्त्रास्त्रे पुन्हा हस्तगत केली. दसऱ्याच्या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या ह्या आणि अशा अनेक कथा आपल्या पुराणांमध्ये आहेत. पांडवांनी अज्ञातवास संपवून युद्धाची तयारी सुरु केली म्हणूनच असेल कदाचित, पूर्वीच्या काळी युद्धाच्या मोहिमा दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु केल्या जात होत्या. दसऱ्याच्या दिवशी आपल्या राज्याच्या सीमा विस्तारित करण्यासाठी सीमोल्लंघन होत होते.

अभिनव विचार संग्रह - (१)

Submitted by निमिष_सोनार on 1 October, 2014 - 03:10

(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक!

(२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात.

(3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!!
आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका.
त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का?

एण्ड ऑफ इझम्स

Submitted by गण्या. on 15 September, 2014 - 10:06

फ्रांसिस फुकुयामा (Francis Fukuyama) यांनी १९८९ ला लिहीलेल्या निबंधाचा (The National Interest
, Summer 1989 ) विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित झाला होता. त्यांनी त्या वेळी एण्ड ऑफ हिस्टरी अशी एक त्यावेळी आचरट वाटावी अशी कल्पना मांडली. गोर्बाचेव्ह यांच्या ग्लासनोस्त आणि पेरेस्नोईका या दोन शब्दांनी कम्युनिस्ट रशियात नवं वारं वाहू लागलं. त्याचा परिणाम म्हणून कम्युनिझम चा पाडाव झाला.

शब्दखुणा: 

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

Submitted by नितीनचंद्र on 9 September, 2014 - 02:34

पुनर्जन्माच्या विषयाला वाहिलेली अमेरिकन संस्था

पुनर्जन्म हा तसा अनेक मायबोलीकरांच्या आणि तथाकथीत बुध्दीपामाण्यावाद्यांच्या दृष्टिने चेष्टेचा, टिंगल टवाळीचा आणि टीका करण्याचा विषय आहे. भारतात हिंदु धर्म असा आहे की जो कर्मसिध्दांत आणि त्याला जोडुन असलेले प्रारब्ध्द आणि त्याला जोडुन येणारा पुनर्जन्म ह्या विषयाला मान्यता देणारा आहे. याच कारण हा धर्म किंवा जड वाटत असेल तर संस्कृती म्हणा एका पुस्तकाच्या आधाराने चालणारा नाही. अनेक ग्रंथ गुढ अश्या विषयावर भाष्य करताना दिसतात तसेच आजच्या जीवनाशी त्याची सांगड घालताना दिसतात.

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान