सत्संग महिमा

सत्यासत्य

Submitted by पुरंदरे शशांक on 6 September, 2017 - 00:44

सत्यासत्य

लटिका संसार । गुंतवितो फार । सावलीचा भार । तैसे होय ।।

मृगजळी पूर । भय ते जीवास । साच अविनाश । दिसेचिना ।।

कृपाळुवा तुम्ही । सर्व संत जन । दाखवी निधान । सत्य थोर ।।

दूर होता जाण । दुःस्वप्न भीषण । शांति समाधान । लाभे जीवा ।।

घेता अनुभूती । सत्याचीच सदा । गोंधळूक कदा । होईचिना ।।

निवांत निश्चल । होवोनिया मन । श्रीहरी चरण । चिंतीतसे ।।

ॐ तत् सत् ।।

निधान = ठेवा, खजिना

सत्संग महिमा

Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2015 - 23:41

सत्संग महिमा

चित्ता व्यापुनिया | नाना दोष तण |
होत ना प्रसन्न | कदाकाळी ||

तीर्थ सत्कर्माचे | शुद्ध करीतसे |
चित्त अनायासे | साधु संगे ||

संतसंगतीने | दोष निवारता |
अपार शांतता | लाभतसे ||

सहज उच्चार | विठ्ठल नामाचा |
गाभारी मनाच्या | घुमतसे ||

चित्त होते लय | पूर्ण चैतन्यात |
सुख बरसत | अमृताचे ||

अमृताचे पुत्र | तुम्ही आम्ही सारे |
गर्जती अपारे | साधुसंत ||

घ्यावे आकळोनि | परमार्थ सार |
नमवोनि शिर | संतांपायी ||

हरि ॐ तत् सत् ||

Subscribe to RSS - सत्संग महिमा