तत्त्वज्ञान

धर्माच्या नावाचे ब्रॅन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 10 December, 2014 - 01:17

जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रँड आहे. होय हा ब्रँड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॉटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे महंमद मुस्लिम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हिड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत.

नात्यांचे महत्त्व आणि सिद्धता

Submitted by निमिष_सोनार on 10 December, 2014 - 00:02

एकाला कमी लेखले तरच दुसरा चांगला सिद्ध होतो हे नात्यांचे गणित चूक आहे.
नावडत्या व्यक्तीला कमी लेखले तरच आवडता व्यक्ती श्रेष्ठ होतो असे नाही.
पत्नीला कमी लेखले तरच आई विषयीचे प्रेम सिद्ध होते असे नाही.
वडिलांना कमी लेखले तरच आईचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
एका अपत्याला कमी लेखले तरच दुसऱ्या अपत्याचा चांगुलपणा सिद्ध होतो असे नाही.
सुनेला कमी लेखले तरच लेकीचे महत्त्व राहते असे नाही.
पुरुषांना कमी लेखले तरच स्त्रीचे महत्त्व सिद्ध होते असे नाही.
भाग्याला दोष दिला तरीही प्रयत्नांचे महत्व कमी होत नाही.
भाग्याने साथ दिली तरीही आपल्या कर्माच्या फळाचे महत्त्व कमी होत नाही.

ज्ञानेश्वरांच्या चरित्रविषयक मतभेद

Submitted by मी मी on 29 November, 2014 - 12:20

संतसाहित्य वाचत आहे सध्या. आपल्याच संस्कृती बद्दल बऱ्याच गोष्टी नव्याने कळत आहेत विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांबद्दल वाचतांना विश्वास बसू नये अश्या काही बाबी वाचनात आल्यात. त्यांच्या ज्ञानेश्वरी बद्दलही अनेक वादंग आहेत त्यावर सांगोपांग चर्चा झाल्या आहेत आणि संशोधन सुद्धा सुरु आहे. काही शंका आणि तर्कांचे प्रमाण मिळालेत काहींचे नाही पण धूर उठलाय तर कुठेतरी काहीतरी आहे हे नक्की … त्यातले काही मुद्दे खाली मांडते … जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.

आहे रे नाही रे , हिरावणे आणि तुलना उपदेश या बाबत थोडेसे ...

Submitted by निमिष_सोनार on 28 November, 2014 - 01:20

मला सुचलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला पटले किंवा नाही ते कळवा:

(१) आहे रे आणि नाही रे...!!

(अ) "आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे" - इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय??

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष

Submitted by निमिष_सोनार on 21 November, 2014 - 01:06

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.

२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.

3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.

४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत
तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात.

५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात

आम्ही अस्पृश्याची पोरे

Submitted by Devadatta Parulekar on 20 November, 2014 - 07:36

विठ्ठलाचा पुत्र
रुक्मिणीचा बाळ
संन्याशाचे पोर
म्हणूनी अस्पृश्य
 
नका दे‌ऊ अन्न
नका दे‌ऊ पाणी
नका दे‌ऊ थारा
पहा हा अस्पृश्य
 
सावली पडता
दूर हो म्हणती
शिव्या शाप देती
म्हणती अस्पृश्य
 
दुषणे ठेविली
भिक्षा नाही दिली
मुंज नाही केली
ठेविले अस्पृश्य
 
ज्ञानराज श्रेष्ठ
भक्तराज श्रेष्ठ
योगीराज श्रेष्ठ
परि तो अस्पृश्य?
 
गीता उपदेशी
बोले ज्ञानदेवी
ज्ञान करी मुक्त
परि तो अस्पृश्य?
 
विठोबाचा प्राण
विसोबाचा गुरू
नामयाचा बाप
परि तो अस्पृश्य?
 
जनीची साजणी
दीनांची मा‌उली
संतांची सा‌उली
तरी ती अस्पृश्य?
 
तुम्हा ती अस्पृश्य

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता - श्री ज्ञानेश्वरी अभ्यास भाग - १२

Submitted by पुरंदरे शशांक on 19 November, 2014 - 23:02

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता ...
(ज्ञानेश्वरी अभ्यास - भाग १२ )

विपायें जरी आठवला चित्ता | तरी दे आपुली योग्यता | हें असो तयातें प्रशंसितां | लाभु आथि ||अ. ६-१०४||
(जयाचे स्मरण | स्वभावेचि होता | आपुली योग्यता | देई जो का ||
बहु बोलु काय | तयाचे स्तवन | होय ते पावन | लाभदायी || अभंग ज्ञा.)

माऊलींची ज्ञानेश्वरी अतिशय थोर ग्रंथ का आहे तर त्यात या अशा बहारदार, अनुभूतिपूर्ण ओव्या आहेत म्हणून.

सुपरगर्ल सोलापुरची साक्षी मोरे ? व आणखी एक मुलगा ( ५/१२/२०१४ )

Submitted by नितीनचंद्र on 14 November, 2014 - 09:49

१४ नोव्हेंबर २०१४ रात्रीचे ८ वाजले आहेत. समोर मराठी टी व्ही ९ चॅनल सुरु आहे. मी पहात आहे सोलापुरच्या साक्षी मोरे हिची तिच्या वडीलासमवेत आणि मानसओपचार तज्ञ डॉ राजेद्र बर्वे यांच्या समोर टेस्ट चालु आहे.

साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.

टि व्ही ९ या चॅनलच्या टेस्ट हिने पार केल्या.

ही शक्ती जन्मजात नव्हती. तिच्या वडीलांनी १२ हजार फी देऊन काही महिन्यांपुर्वी मीड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन नावाचा कोर्स केल्यानंतर ही कला अवगत झाली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

शब्दखुणा: 

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान