लाभो संतसंग

Submitted by नवनाथ राऊळ on 24 June, 2015 - 03:06

लाभो संतसंग । भक्तीचा पैं ठेवा ।
घडो हरीसेवा । जन्मोजन्मीं ॥१॥

ज्ञानियांचा राजा । भक्तराज नामा ।
मार्ग विष्णूधामां । उजळितीं ॥२॥

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥

तुका एका चोखा । वैष्णव मंडळी ।
तयां पायधुळीं । नाथ शुद्र ॥४॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥ >>>>> ओ हो - याची तुलना माऊलींच्या या ओवीबरोबर करता येईल -
जे परिणामा निघाले कोंभ| जे धैर्यमंडपाचे स्तंभ| जे आनंदसमुद्रीं कुंभ| चुबकळोनि भरिले ||अ. ९-१९१||

अतिशय सुर्रेख रचना....

आणि योगायोगाने आज सकाळी मीदेखील सत्संग महिमा नावाची रचना इथे पोस्ट केलीये... Happy

आज पुण्यनगरीत श्री तुकोबाराय व श्री माऊलींच्या पालख्यांचे आगमन होत आहे.

साधुसंत येती घरा | तोचि दिवाळी दसरा || श्री तुकोबाराय ||

ज्ञानबा तुकाराम | ज्ञानोबा तुकाराम ||