अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान वैद्यकीय तपासणी
माझे आई वडील सध्या आमच्या बरोबर अमेरिकेत राहत आहेत. त्यांचा मेडिकल इन्शुरन्स घेतला आहे. आई ला हाय ब्लड प्रेशर व डायबेटीस असल्याने, ती भारतात असताना सर्व तपासणी वेळोवेळी करून घेत असते. अश्या तपासण्या अमेरिकेत करता येतात का? आणि करायच्या झाल्यास, डॉक्टर च्या सल्ल्यानेच जाता येते कि थेट Lab मध्ये जाता येते?
क्रुपया आपले काही अनुभव असल्यास मार्गदर्शन करावे.

