प्रवास

प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते ..?

Submitted by TuKaRam44 on 29 June, 2019 - 02:13

हे जे सायबर अत्याचार झाले, ते सगळं काही करणांसाठीच घडलं का? मी अजुन माहिती काढली आणि कळलं की 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पणे, त्यांच्या प्रतिसादात त्यांनी हेच म्हटलेलं लक्षात आलं की कोउनसेलर म्हणुन त्या स्वतः बरच काही शिकुन गेल्या! ...

प्रत्येक गोष्ट काही कारणासाठी घडते ..?

Submitted by TuKaRam44 on 29 June, 2019 - 02:13

हे जे सायबर अत्याचार झाले, ते सगळं काही करणांसाठीच घडलं का? मी अजुन माहिती काढली आणि कळलं की 'मीना उत्तरा' ह्यांनी केलेल्या अनेक कौटुंबिक वादांच्या निरसनांमुळे त्यांना 90's मध्ये मुंबई हायकोर्टाने फॅमिली कोर्टमध्ये ऑनोररी पद्धतीने लोक अदालत संबंधित अनेक केसेस सोडवायला फॅमिली कोनसेलर म्हणून बोलावले होते व त्यांनी अनेक केसेस सोडवल्या होत्या , कुटुंब मिञांपासून वाचवलेली कळलं, ते त्यांनी केले अत्यंत यशस्वी पणे, त्यांच्या प्रतिसादात त्यांनी हेच म्हटलेलं लक्षात आलं की कोउनसेलर म्हणुन त्या स्वतः बरच काही शिकुन गेल्या! ...

थाइलंड - कोणी थाइलंड ला आहे का? किंवा काही माहिती आहे का ?

Submitted by 'सिद्धि' on 9 May, 2019 - 04:35

आम्ही ३ दिवसां पूर्वीच बँकॉक मध्ये आलो आहे. company कामानिमित्त एक महिना इथे आहे. बँकॉक पासून ट्याक्सी ने २ तासांच्या अंतरावर होटेल रिव्हर, ठिकाण नाखोनपातम असं काहीस pronunciation आहे.
Address च्या अधीक माहिती साठी होटेल booking जोडलय... please help .

IMG_20190509_140755.jpg
.
ईकडे Indian food जवळपास कुठे मिळेल का?
Veg किंवा non veg काही ही चालेल.
डाळ-भित,बिर्याणी, पुलाव, भाजी-पोळी काही चालेल. इथलं जेवण फार वेगळ आहे, चव सुद्धा विचित्र लागते.

शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक २

Submitted by हर्पेन on 4 April, 2019 - 01:57

भाग १
https://www.maayboli.com/node/69326

भाग २ चालू

पूर्वपीठिका

लेहला पोहोचल्यावर रिपोर्टींग करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे ब्रिफींग करण्याकरता सगळ्यांना बाहेरच उणे बारा तपमानात एकत्र जमायला सांगितले होते. इतक्या थंडीत बाहेर एकाच जागी उभे रहायचे म्हणजे जरा त्रासच होता. वारा तर जाऊच दे पण नुसती झुळूक जरी आली तरी अजूनच गारठायला व्हायचं. आम्ही सगळे मिळून जवळपास तीस जण असू त्यामुळे इतके सगळे नीट मावतील अशी जागा तिथे नव्हती आणि आता असं 'बाहेर' राहण्याची सवय करणे गरजेचे होते.

विषय: 

शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक १

Submitted by हर्पेन on 18 March, 2019 - 12:41

खाली मान घालून पायाखालची वाट नजरेआड न करता एका मागोमाग एक असे आम्ही १९-२० जण नागमोडी वळणे घेत घेत चालत होतो आणि अचानक एका वळणा नंतर आमचा लीडर अचानक चित्कारता झाला. नक्की काय बोलतोय हे लगेच काही कळले नाही पण तो दाखवत होता त्या दिशेला पाहता ताज्या बर्फावर उमटलेले ते पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि ते ज्या डोंगरदिशेला गेले होते तिकडे वरती आकाशात बरेच पक्षी घिरट्या घालत होते. लीडरच्या अंदाजानुसार ते ठसे बिबट्याचे होते आणि नुकत्याच केलेल्या शिकारीची चाहूल लागल्यामुळे ते पक्षी तिकडे जमा झाले असावेत.

सौदी अरेबियाविषयी माहिती हवी आहे

Submitted by Namrata Siddapur on 26 February, 2019 - 01:45

माझा नवरा कामानिमित्त १ महीना सौदी अरेबियातील यानबु येथे जाणार आहे. पहिल्यांदा सौदीअरेबिया ला जाणार म्हणुन काही प्रश्न आहेत..
१. काय न्यावे आणि काय नेऊ नये(चुकुनही)
१. कामाच्या ठिकाणी काय काळजी घ्यावी.
३.या आणि पुढील महिन्यात तापमान किती असेल दिवसा आणि रात्री)
४. नवरयाला नेहमीच खूप घाम येतो तर काय काळजी घ्यावी.
५. कोणती प्रेक्षणीय स्थळे बघावी.
६. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी पेहरावाचे काय बंधन?
७. खाण्याच्या कोणत्या वस्तू घेउन जाता येतात ?
८. नवरयाला फक्त पोहे, मॅगी, चहा करता येतो, शुध्द शाकाहारी हॉटेल आहेत का?

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५

Submitted by स्वच्छंदी on 6 February, 2019 - 04:24

काही दिवसांच्या ब्रेक नंतर आणिक दोन नविन शब्दचित्रे घेऊन आलोय. पहील्या तिन भागांच्या लिंक इथे आहेत -

विषय: 

जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित

Submitted by अतुल. on 2 February, 2019 - 00:35

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का? कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.

व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग २

Submitted by समई on 26 December, 2018 - 02:34

आमचा नऊ जणांचा ग्रुप तयार झाला.माझे सख्खे दीर श्रीकर,जाऊ शिल्पा,एक मामे जाऊ वृषाली,एक मावस जाऊ सुलक्षणा,तिची नणंद मृणाल,मृणालचे मिस्टर चंद्रशेखर, माझे एक मावस दीर अजय,ह्यांना आम्ही ग्रुप लीडर केले,माझे मिस्टर शेखर,आणि मी.ही नावे लिहिण्याचे कारण भारतात कंबोडियाहून परत येताना तिथल्या चेक इन काउंटर वरच्या मुलीचा शेखर,श्रीकर आणि चंद्रशेखर ह्या नावांमुळे झालेला मजेदार गोंधळ,तो मी पुढे सांगेनच.सर्व पासपोर्ट, व्हिसाच्या formalities पूर्ण करून(त्या मी इथे देत नाही ,कारण त्यांचे नियम बदलत असतात)16 नोव्हेंबरच्या रात्री १.४०ला एअर इंडिया च्या विमानाने बँकॉकला प्रयाण केले.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रवास