मथुरा सोडून दहा मिनिटे झाली होती. नव्या प्रवाशांना अटेंडंटने नॅपकीनही देऊन झाले होते. मथुऱ्याच्या आधी ऑनबोर्ड हाऊसकिपिंगवाले गाडीची साफसफाई करून गेले होते. त्यांचा प्रमुख आमच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन एकाकडून फिडबॅक फॉर्म भरून घेऊन गेला होता. त्याचवेळी तिकडे वातानुकूल रसोई यानामध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झालेली होती. मथुऱ्याच्या आधी सगळ्यांचे चहा-कॉफीच्या कीटसोबत आलेले मसाला शेंगदाणे, व्हेज सँडविच, कचोरी, मातीचूर लाडू आणि फ्रूटी असे सर्व काही खाऊन-पिऊन झालेले होते. जेवणाची वेळ होण्यासाठी अजून थोडा वेळ होता.
शनिवारी विवेक मराठे सरानी "चिलीम खडा" रविवारी दिनांक ११सेप्टेंबर १६ रोजी सर करण्याचा छोटेखानी बेत मांडला. सवंगडी तयार झाले, माझी निश्चिती कळविण्यास विलंब झाला आणि मी वेळेवर होकार दिला.
नरवीर तानाजी मालुसारे रस्त्यावरील अभिरुचि येथे भेटून दुपारी १च्या सुमारास सिंहगडाकडे दुचाकीवरुन मार्गक्रमण केले. पार्किंगच्या आधी असलेल्या खिंडीत गाड्या लावून पायवाटेने चालायला सुरुवात केली.
विवेक सरानी पूर्वी हा कडा प्रस्तारारोहन केलेला होता आणि त्यामुळेच आम्हाला आरोहण मार्गाची काळजी नव्हती तसेच सोबत जुजबी साहित्य सुद्धा होते.
तिसरा दिवस मी खास कोडैमध्ये फिरण्यासाठी ठेवला आहे. bryant park, coaker’s walk,pillars rocks, guna caves,lake,bear shola falls,wax museum हे सारे विझिटिंग पॉईंटस.
दमदार पाऊसानेच आजच्या दिवसाला सुरवात झाली. पण मी आज जरा निश्चिन्त आहे कारण माझे मेन टार्गेट कालच पूर्ण झाले आहे. पण कोडैला येऊन कोडै फिरायच नाही म्हणजे थिएटर मध्ये जाऊन पिचर न बघता झोपून येण्या सारख मला वाटू लागल. काल पण मी भिजलोच होतो मग आज काय बिघडले!! म्हणून मी लगेच तयार झालो. नाष्टा केला आणि पाऊस थांबायची वाट बघत बसलो. साधारण 10 वाजता पाऊस थांबला.
गेल्या वर्षी त्या दिवशी मी जरा जास्तच उत्साहात होतो. माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होत होती. अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होत असताना पाहून कोणाचा उत्साह वाढणार नाही, नाही का! मागच्या वर्षी वाढदिवस दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन आतून पाहायला जाऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दिल्लीचा प्रवास जाता-येता मुंबईहून करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन कारणे होती. एक तर पश्चिम एक्सप्रेस आणि दुसरी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस. मग त्याप्रमाणे नियोजन करून तीन महिने आधीच पाहिजे त्या गाड्यांचे आरक्षण करून ठेवले.
Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते!
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.
हाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .
मागच्या वर्षी ज्ञानसेतू (ज्ञान प्रबोधिनी) तर्फे रोईंग (अरुणाचल)ला जाण्याचा योग आला अन तिथल्या निसर्गसौंदर्याच्या व लोकांच्या प्रेमातच पडलेपरतीला विवेकानंद केंद्र, गुवाहाटीला एक दिवस मुक्काम केला. मीरादिदींबरोबर एक दिवस त्यांच्या बरोबर अनेक केंद्रांना भेटी देत, कामाख्य मंदिराला भेट असा मस्त मजेत घालवला. तेव्हाच त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्या खोंसा (तिराफ) ला आरोग्य शिबिरासाठी मदतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं. मनापासून इच्छा होती आणि ती फलद्रुपही झाली. खोंसाला शिबीर करायचं व आजूबाजूचा प्रदेश बघायचा असं ठरवलं होतं.
बरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे-कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकुलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती.