मी शब्दवेडा - भाग 1

Submitted by दिपक ०५ on 22 April, 2017 - 11:49

भाग - 1

प्रत्येक माणसाचा जगण्याचा दष्टीकोन हा वेगवेगळा असतो.. आता उदाहरण म्हणून एक किस्सा सांगतो .....

 हि घटना आहे पाच वर्षा आधिची. आम्ही कॉलेजमध्ये होतो .. 12 वीचं वर्ष होतं.. अभ्यासाचा दबाव तर होताच... पण enjoyment full on. चालु  होत... 

तसा आमचा गृप पुर्ण कॉलेजमधे गाजलेला होता.. सगळ्याच बाबतीत आमचा गृप पुढे  असायचा..  शक्यतो सगळ्यांचा स्वभाव सारखांच.. पण कोमल !!..

तीचा स्वभाव थोडा शांत व विचित्र होता.. सगळे मजा करत असताना ती शांत एकटिच बसायची.. थोडयांना वाटाययं की तिला यात interest नसेल. व  थोडयांचे मत असे होते कि  आपण हिच्या भानगडीत न पडलेलं बरं. अता त्यात मिही होतो  म्हणा.. पण शक्यतो तिला सगळे ignore करायचे..   आणि आजच्या काळात कोण  कोणाचा विचार करतयं ??

तर असं चालल होत... तर  एका रवीवारी मला  रमेश चा कॉल आला .

 रमेश : अरे  जयंत बोलतोयस का ?

मी :  हो.. आपण कोण ?

रमेश : अबे मी रमेश बोलतोय.

मी : बोल. काय पाहिजे एवढया सकाळी ?

रमेश : ए.. अधि ऐक तरं... गोप्याच्या birthday ची  पार्टी आहे आज.. आणि तुला यायचं आहे आज..

मी : अरेरे. सॉरी पण आज नाही जमणार यार..

रमेश : मला काहीही  ऐकूण ध्यायचं नाहीये.. तूला यायचं आहे  बस्स!!.. तूझ्यामुळे आमचा सगळा प्लान विस्कटेल यार...

मी : ( वैतागुन ) बरं ठिक आहे. पण कूठे जायचं ठरवलय ? आणि कोण कोण निघालय ?

रमेश : अरे मागच्या वेळी आपण गेलतो ना  फिरायला.. त्या समुद्र काठी. तू , मी साक्षी अजय, गोप्या , अस्मिता आणि कोमल.

मी : कोमल ??

रमेश : अरे  हो... अस्मीतानं तयार केलय तिला  येण्यासाठी.   चल अता ठेवतो सगळ्याना आटपायला सांगायला पाहिजे. आणि तू पण लवकर तयार  हो रे ! बस स्टॉप  वर भेट्रू...

 या अचानक झालेल्या प्लॅन पेक्षा कोमल येनार याच मला जास्त आश्चर्य वाटत होतं.. पण मनात उत्सुकता तर होतीचं... शेवटी मित्रांसोबत केलेली मज्जा वेगळीचं !!

11 वाजले आणि मी बस स्टॉप वर पोहोचलो... पण वातावरण थोडे गरमावले होते.. सगळे माझ्यावर भडकले. जणु काय माझिच वाट बघत होते... त्या सर्वाना शांत करत मी दमाचा श्वास घेतला... आणि माझे लक्ष कोमल कडे गेलं..  ती एकटीच शांत बसलेली... मी तिला बघुन हाय केलं ती ही हलो म्हणुन उदगारली... 

इतक्यात यांचा  भोंगा सुरू झाला बस आली बस आली. सगळे त्या बसमधे चढण्यासाठी गुराढोरांसारखी धक्का मुकी  करत होते.. गोप्या तर ड्राइवर च्या सीटवर जाऊन पसारला..  हा सगळा तमाशा मी खालुन पाहात  होतो.. कोमलही खालीच  होती.. आणि हा असा मुर्खपणा पाहून ती  हसली.. कारण  सकाळची वेळ असल्याने सगळी बस खालीचं  होती..

पण तीचा हा हसरा चेहरा माझ्यासाठी नविन  होता.. ती हसतचं मला  म्हणाली चल बस निघेल इतक्यात.. आणि आम्ही बसमध्ये चढलो.. सगळे निवांत पसरले  होते बसमध्ये दोनचं सीट खाली  होत्या मी खिडकी कडे बसलो व माझ्या बाजुला ती बसली...

माझ्या मनातली  उत्सुकता  अंत सीमेवर पोहोचली होती.. हिला  काय प्रॉब्लेम असेल ही  अशी का गप गप राहते.. जर हिचा  स्वभावचं असा आहे  तर मग आज स्टॉप वर ???.. न राहावून मी विचारलं -

मी : मग अभ्यास कसा चाललायं?

ती : बरा  आहे. तुझा ?

मी : माझा पण. ( डोळे बंद  करून मी दिर्घ श्वास घेतला आणि मनात  विचार आला की आता विचारूनचं टाकूया पूढे काय होईल ते होऊदे.. )

मी : माझ्या मनात एक शंका आहे.. ती मी तुला विचारू शकतो का.?? ( मि हडबडत  माझ वाक्य पुर्ण केलं.)

ती : विचार ना.. काय शंका आहे. ??

मी : तू अशी गप गप का राहतीस ? तुला काय प्रोब्लेम असेल तर तू माझ्या सोबत शेअर करू शकतीस !

ती  : .............

To be Continued !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users