प्रवास
मानवी / अमानवीय अनुभव (कोलाज)
पेट्रोल किती रुपये गेल्यावर तुम्ही गाड्या वापरणे बंद कराल?
पेट्रोल/डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. खाजगी गाडीने प्रवास करणे हळूहळू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. पेट्रोलवाढ अशीच सुरु राहिली तर लवकरच पेट्रोल मटणापेक्षा महाग होईल आणि येत्या काही वर्षात सोन्यापेक्षा महाग होऊ शकते. अशी वेळ आली तर लोकांना बाहेर फिरणे कठीण होईल कारण पेट्रोल चोरीसाठी अनेक गाड्यांवर दरोडे पडतील. त्यामुळे सायकल व पायी जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरणार नाही. इलेक्ट्रिक कारने बाहेर फिरणे पण अवघड होईल कारण गाडयांना चार्जिंगसाठी जनरेटरची गरज असते आणि जनरेटर डिझेलवर चालतात. त्यामुळे त्या जनरेटरवर पण कोणीतरी डाका टाकून त्यातलं डिझेल लंपास केलं असेल.
लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास
लॉकडाऊन जरा शिथिल होऊ लागल्यावर केलेला माझा पहिलाच प्रवास होता तो. त्या प्रवासाला नुकतेच एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. त्या निमित्ताने लॉकडाऊननंतरच्या त्या पहिल्याच प्रवासाच्या आठवणी....
"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"
"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"
बकेट लिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोकांच्या मनातल्या इच्छा या कळत्या वयामधल्या असतात.
कुठेतरी बकेट लिस्ट हा शब्द ऐकलेला असतो, बर्यापैकी वाढलेल्या वाचनात आलेला असतो…
कुठेतरी, कोणाच्यातरी बकेट लिस्टबद्दल माहिती आलेली असते, तर कधी चित्रपट आलेले, पाहिलेले असतात.
नवीन कार
नवीन कार घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे
कुटुंबासाठी नवीन कार घेण्याचा विचार चालू आहे . बजेट ८ ते ९ लाखापर्यंत . टाटा कार सुरक्षित असतात पण मारुती चे मायलेज चांगले असते असे मित्रांकडून कळते. ह्युंदाई चा अनुभव नाही. सीएनजी ची सुरक्षितता कमी असते का? सामान ठेवायची जागा सीएनजी टाकीमुळे खूप कमी होते का? आपल्यापैकी कुणी नुकतीच गाडी घेतली असेल तर कृपया गाडी खरेदीचा अनुभव सांगावा . नवीन गाडी लाँच बद्दल माहिती असेल तर त्याचीही चर्चा करता येईल . धन्यवाद
अपघात - एका नव्या ट्रकचा
आज सुरेवारसिंगला ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते.
सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)
सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)
पुणे सिंगापूर पुणे या हिमिमेतील २०००० किलोमीटर प्रवासादरम्यान पर्यावरण आणि शेतीसंबंधीचे अनुभव.
विजिगिषु देश! ... त्याची भारताशी वेस!..... माझी मुशाफिरी! (भाग-५)
गेले दोन दिवस जगातल्या सर्वात आनंदी देशात बुलेटने फिरतोय. रस्ते एकदम चकाचक आहेत. कुठेही कचरा नाही, प्लास्टिक च्या पिशव्या, गुटख्याच्या पुड्या नाहीत. घरं, दुकानं मराठी शाळेतल्या आज्ञाधारक मुलांसारखे शिस्तीत उभे. कुठेही राजकारण्यांचा वाशीला लावून केलेलं अतिक्रमण नाही. गावागावांना जोडणारे घाटाचे रस्ते हिरव्यागार डोंगरातून धावत जाताहेत.
लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !
नजर जाईल तेथवर रंगवलेलं हिरवंगार निसर्गचित्र. रस्त्याच्या दुतर्फा चहाचे मळे पार लांबवरच्या डोंगराकडे धावताहेत. सिलिगुडी - भूतान रस्त्यावरून बुलेटी पळवत आम्ही जयगावला आलो. जयगाव हे भूतानच्या सीमेवरील भारतातलं शेवटचं गाव. सीमेपलीकडे भुतानचं फुनसोलिंग. अगदी खुर्द-बुद्रुक सारखे ही दोन्ही गावं आंतरराष्ट्रीय घरोबा राखत एकदुसऱ्याचा शेजार एन्जॉय करताहेत. जयगावच्या शेवटच्या गल्लीला लागून असलेली कमान ओलांडली आणि भूतानमध्ये प्रवेश केला. ही कमान म्हणजेच बॉर्डर. अंगावर रोमांच उभं राहीलं. आयुष्यात पहिल्यांदाच मोटारसायकल वरून देशाबाहेर पडलोय. भूतानच्या थंडगार हवेने हे रोमांच अधिकच गहिरं केलंय.
Pages
